याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील अध्यक्षस्थानी होते. मारवडचे लोकनियुक्त सरपंच उमेश साळुंखे व उपस्थित मान्यवरांनी सरांचा शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार केला. याप्रसंगी ग्राम शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष हरिभाऊ मारवडकर, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव दौलत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेरचे संचालक उमाकांत साळुंखे, गोवर्धनचे माजी सरपंच देविदास पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष अरुण कुमार साळुंखे, रुपेश साळुंखे, नरेंद्र पाटील, हेमकांत साळुंखे उपस्थित होते. सु. ही. मुंदडे हायस्कूलचे मुख्याध्यापक एल. जे. चौधरी, जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा निकम, स्वाती पाटील, वैशाली पाटील, सारिका काटके, गणेश चव्हाण, संजय पाटील, सुभाष पाटील, अंगणवाडी सेविका जिजाबाई साळुंखे उपस्थित होते. एल. जे. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविकात गणेश चव्हाण यांनी परिचय व कार्य सांगितले. यावेळी जयवंतराव पाटील व उमाकांत साळुंखे आदींनी मनोगत व्यक्त केले.
आदर्श शिक्षकाचा ग्रामस्थांनी केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:16 AM