जळगाव : चोरीच्या चार दुचाकीसह दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे. गोपाल राजेंद्र पाटील व विशाल मधुकर इखे (रा.चिंचोली, ता. जळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. मुख्य संशयित आरोपी मुकुंदा देवीदास सुरवाडे (रा.मेहरूण) हा फरार आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या रेकार्डवरील अट्टल गुन्हेगार मुकुंदा देवीदास सुरवाडे हा दुचाकींची चोरी करून तालुक्यातील चिंचोली गावातील गोपाल राजेंद्र पाटील आणि विशाल मधुकर इखे यांच्यामार्फत गावातील लोकांना विक्री केली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथक तालुक्यातील चिंचोली गावात जाऊन गोपाल पाटील आणि विशाल इखे या दोन्ही संशयित आरोपींना मंगळवारी सापळा रचून अटक केली. त्यांनी चिंचोली गावात विक्री केलेल्या चार दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफ्फूर तडवी, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, सिद्धेश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, शांताराम पाटील यांनी केली. दोन्ही संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयित आरोपी मुकुंदा सुरवाडे हा फरार आहे.
नंबरवरून चोरीची दुचाकी ओळखण्याचे कौशल्य
चोरीच्या दुचाकी नंबरवरून ओळखण्याचे कौशल्य असल्यामुळे गणेश शिरसाळे या अंमलदाराने आतापर्यंत आठ दुचाकी व संशयित पकडले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार, जळगाव शहर ३ व भुसावळ १ अशा ठिकाणी फक्त नंबरवरून चोरीच्या दुचाकी पकडल्या आहेत.