आॅनलाईन लोकमत विशेष /पंढरीनाथ गवळी
भुसावळ, दि.२६ - देशाच्या नकाशावर रेल्वे आणि संरक्षण प्रकल्पांमुळे वेगळी ओळख असलेल्या भुसावळ शहराची आणखी एका गोष्टीमुळे ओळख होते ती या शहरात ब्रिटिश काळापासून वास्तव्यास असलेल्या ख्रिस्ती समुदायामुळे...
हा समुदाय पवित्र बायबलच्या वचनानुसार आपले जीवन जगत आहे. दर रविवारी शहरात असलेल्या चर्चमध्ये प्रभू येशूचे गुणगाण केले जाते. ब्रिटिश काळात या शहरात मोठ्या संख्येने प्रोटेस्टंट व कॅथलिक या ख्रिस्ती पंथांचे लोक वास्तव्यास आहेत. चांगली इंग्रजी बोलता येते म्हणून ख्रिस्ती समुदायातील लोकांना ब्रिटिश अधिकारी रेल्वेत पटकन नोकरीवर ठेवत होते, असा इतिहास आहे.
हा समाज मध्यमवर्गीयांमध्ये मोडला जातो. सर्वसामन्यपणे रेल्वेत जास्त करुन नोकरी करणारा हा समाज आहे. वर्ष भरात मुख्य तीन सण-उत्सव हा समाज वर्षभरात तीन सण-उत्सव साजरे करतो यात पहिला सण म्हणजे पवित्र नाताळ (ख्रिसमस), दुसरा गुड फ्रायडे (उत्तम शुक्रवार) आणि इस्टर असे तीन सण साजरे केले जातात.
प्रभू येशू ही जगात अशी एकच व्यक्ती आहे की, ती उत्तम शुक्रवार नंतर तिसºया दिवशी म्हणजे इस्टर संडेला जिवंत झाली, प्रभू येशूचे पुनरुथ्थान झाल्याचा इतिहास सांगितला जातो. पवित्र बायबल नुसारच दैनंदिन जीवन जगणारा हा समुदाय आहे.
भुसावळ शहरात इंग्रजी, हिंदी, मराठी या तीन भाषा बोलणारा ख्रिस्ती समाज आहे. हा समाज शहरात विखुरलेला आहे. विशेष करुन समता नगरात त्यांचे वास्तव्य जास्त आहे या शिवाय शहरातील अमरदीप टॉकीजच्या मागील भागात व खडकारोड,गडकरीनगरात ख्रिस्ती समुदायाचे वास्तव्य आहे. शहरात पूर्वी गोवानिशही होते मात्र ते आता गोवा, मुंबई, पुणे या भागात स्थाईक झाले आहेत.
एकमेव कब्रस्तान
सर्व ख्रिस्ती समुदायासाठी रेल्वे परीसरात एकमेव कब्रस्तान आहे. या कब्रस्तानाचे विशेष म्हणजे जगप्रसिद्ध अजिंठा लेणींचे संशोधन करणारे ब्रिटिश अधिकारी मेजर रॉबर्ट गील यांची कबर आहे. त्याहीमुळे या शहराची जगात ओळख आहे. दुसरे म्हणजे १९५६ सालातील विश्वसंदुरीचा किताब पटकावणाºया मिसेस डायना यांचीदेखील कबर याच कब्रस्तानात आहे. या शिवाय अनेक ब्रिटिश मेजर, अधिकारी यांच्या कबर आहेत.
भुसावळ : शहरातील चर्च
भुसावळ शहरात ख्रिस्ती समुदायातील लोकांचे धार्मिक व लग्न आदी विधींसाठी ठिकठिकाणी सुमारे १०० वर्षापूर्वीच्या चर्च आहेत. यात महत्त्वाची म्हणजे भुसावळ रेल्वे स्थानकाला लागून असलेली सेक्रीट हार्ट चर्च (पवित्र हृदय), अलायन्स मराठी चर्च, मराठी, इंग्रजी सेंट पॉल चर्च, झेडआरआयटीसी परीसरातील हिंदी-इंग्रजी चर्च, इम्यानुएल मराठी चर्च, गडकरी नगरातील सेव्हंथ डे अडव्हांटेज मराठी चर्च, पंधरा बंगला येथील एजीसी चर्च आहेत.