आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.१३ : मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्यांकडे कुणाचेही काही काम असल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सांगा ते चुटकीसरशी करतात. सध्या ते राज्यातील सर्वात पावरफूल मंत्री असल्याचे प्रतिपादन भाजपाचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी शनिवारी केले.चिखली अर्बन बँकेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गिरीश महाजन यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले. महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यच होता. त्यामाध्यमातून काळा पैसा बाहेर निघाला. जिल्ह्यात अनेक पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. जामनेरच्या व्यावसायिक विकासात चिखली अर्बन बँकेचा मोठा वाटा राहिल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या बँकेने गोरगरीब जनतेला अर्थपुरवठा करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सतीश गुप्त, ज्योत्स्ना गुप्त, भालचंद्र कुलकर्णी, जालिंदर बुधवंत, संजय भगीरे, उत्तम थोरात,दिलीप खोडपे, विद्या खोडपे, जितू पाटील, प्रा.शरद पाटील, अशोक नेरकर, चंद्रशेखर काळे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडे काम असेल तर गिरीश महाजन यांना सांगा : भाजपाचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 5:05 PM
जामनेर येथे अर्बन बँकेच्या शाखेचे उद्घाटन
ठळक मुद्देचिखली अर्बन बँकेने गोरगरीब जनतेला अर्थपुरवठा करावापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यचजलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सध्या राज्यातील सर्वात पावरफूल मंत्री