जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र या साठी प्रत्येकाचे सहकार्य मिळणे आवश्यक असताना नागरिक अजूनही घराबाहेर फिरत आहेत. प्रत्येकाने आपापल्या घरात राहून ही लढाई जिंकायची आहे, तसे झाल्यास यात हमखास यश मिळू शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेण्यासह या लढाईत जनतेच्या हितासाठी वेगवेगळ््या उपाययोजना करणे व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सकाळी सात वाजेपासून ते रात्री दोन वाजेपर्यंत सामान्य जनता, यंत्रणा व शासन निर्णय यात समन्वय साधून कोरोना विरुद्धच्या लढाईत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात झालेला हा संवाद.....प्रश्न - कोरोनाशी लढतांना उत्तर- आपला दिनक्रम कसा आहे ?सध्या दिनक्रम सकाळी सात वाजेपासूनच सुरू होऊन रात्री दोन वाजता संपतो. यात सकाळी उठल्यानंतर जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेऊन काय उपाययोजना करायचा याविषयी तयारीला लागावे लागते. तसेच केंद्र, राज्य पातळीवरील काय निर्णय आहे व इतर माहितीसाठी विविध ग्रुपच्या माध्यमातून माहिती घेऊन संबंधितांशी संपर्क साधून सूचना दिल्या जातात. कार्यालयात आल्यानंतर दैनंदिन कामाला सुरूवात करून वेगवेगळ्या बैठका असतात. या सोबतच जिल्ह्यातील नित्याचे कामे मार्गी लावणे, आदेश जारी करणे व संध्याकाळी पुन्हा स्थिती पाहून आदेशात सुधारणा करणे अशा उपाययोजना केल्या जात आहे. संध्याकाळी सहा वाजता दैनंदिन बैठकीत आढावा घेऊन त्या विषयी उपाययोजना करणे, सरकारचे मार्गदर्शन घेऊन जिल्ह्यात करायवयाचा कार्यवाहीच्या दिल्या जातात.प्रश्न - या सर्व कामात कुटुंबाला वेळ कसा दिला जातो ?उत्तर - आज सर्व नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाविषयी व आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित कामे संपत नाही तोपर्यंत कार्यालयात थांबून ते मार्गी लावल्यानंतरच घरी जातो. त्यानंतरही रात्री दोन वाजेपर्यंत सर्व अद्यायावत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेला सूचना देण्याचे काम नित्याने सुरू असते.
प्रश्न - सर्व यंत्रणा कामाला लागली असताना जनतेला काय संदेश द्याल?उत्तर - सर्व यंत्रणा जनेतेच्या हितासाठी लढत असताना नागरिक मात्र अद्यापही घराबाहेर पडत असल्याची खंत आहे. यंत्रणेला हातभार लावण्यासाठी सर्वांनी घरीच थांबा, आम्ही येथे आहोत, एवढेच सांगावसे वाटते.
जिल्हा पातळीवर विविध निर्णयसध्या कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी, लॉक डाऊन असल्याने अस्थापना, विविध कार्यालयातील बहुतांश कर्मचारी, संस्था, दुकान, हॉटेल्स बंद असून सर्वांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ही मंडळी घरी कुटुंबासह वेळ घालवित असली तरी कोरोना विरुद्धच्या लढाईत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा व अनेक ज्ञात-अज्ञात मंडळी कोरोनाशी दोन हात करीत आहेत. यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी परिस्थितीनुरुप करण्यात येणा-या उपाययोजनांमध्ये जिल्हा पातळीवर विविध निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे हे दररोज विविध जनहितार्थ निर्णय घेत आहेत.
कोरोना विषाणूला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार विविध उपाययोजना करीत असून जिल्हा स्तरावरदेखील करण्यात येणा-या उपाययोजनांचा एक भाग म्हणून विविध निर्णय घेत आहोत. त्याचे पालन सर्वांनी करावे.- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे.