लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या लसीबाबत अद्याप अनेक बाबी अस्पष्ट असून, आता केवळ डाटा गोळा केला जात आहे. मात्र, सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर लस आल्यानंतर ती घेऊच अशी भूमिका आयएमएने मांडली आहे. आयएमए सदस्यांची हीच भूमिका असल्याचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांनी सांगितले.
जळगावातील शासकीय आणि खासगी यंत्रणेतील सुमारे १६ हजारांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. यासाठी डाटा गोळा करण्यात आला असला तरी नेमकी कोणती लस येणार, त्याचे किती डोस किती दिवसांनी द्यावे लागणार, ती लस कधी येणार, या बाबी अद्याप अस्पष्ट आहेत. शिवाय काही लसी या दुसऱ्या टप्प्यात असून काहींची स्टेज थ्रीची क्लिनीकल ट्रायल झालेली आहे. त्यामुळे अजूनही अनेक बाबी अस्पष्ट आहेत. असेह डॉ. फेगडे यांनी सांगितले. शिवाय लसीबाबतीतच्या अफवांवर विश्वास न ठेवता, शासनाकडून अधिकृत मार्गदर्शक सूचना बघूनच निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.