नगरपालिकेच्या अमरधाम येथील शवदाहिन्या पूर्णपणे निकामी झाल्या असून, त्याठिकाणी अंत्यसंस्कार करताना नातेवाइकांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. सद्यस्थितीत कोरोना महामारीमुळे शहरातील अनेकांनी आपले प्राण गमविले आहेत. आज जिवंतपणी तर हाल आहेच, पण मृत्यू झाल्यावरसुद्धा अमरधाममध्ये हाल होत आहेत. म्हणून याठिकाणी नूतन शवदाहिन्या त्वरित बसविण्यात याव्यात व लोकांची होणारी फरफट थांबवावी; अन्यथा पीपल्स सोशल फाउंडेशनच्यावतीने शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येईल व त्यातून मिळालेला पैसा जमा करून फाउंडेशनच्यावतीने शवदाहिन्या बसविण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गवळी, माजी नगरसेवक प्रदीप राजपूत, पीपल्स सोशल फाउंडेशन अध्यक्ष आकाश पोळ, उपाध्यक्ष शिवसागर पाटील, हर्षल माळी, प्रवीण जाधव, अतुल चौधरी, गौरव पाटील, श्रीकांत आव्हाड, रोशन चव्हाण, प्रशांत पाटील, साहिल आव्हाड, सनी सरोदे, सुमित पवार, सारंग जाधव, हर्षल बोरसे आदी उपस्थित होते.
शवदाहिन्या न बसवल्यास ‘भीक मागो’ आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:12 AM