जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येकाने फिल्डवर जावून काम करावे. कोणती व्यक्ती व गुन्हेगार निवडणुकीत अडचणीचा ठरु शकतो, याची माहिती स्थानिक कर्मचाऱ्यांना असते, त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवायांचा कागदी आकडा नको, त्यात एखादी गुन्हेगार सुटला तर प्रभारी अधिकाºयाला जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचा आढावा घेण्यासाठी दोरजे शनिवारी जळगावात आले होते. पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील अधिकाºयांची बैठक घेतली. त्यात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, प्रशांत बच्छाव यांच्यासह उपअधीक्षक व प्रभारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशननिहाय आढावा घेतला.जळगाव, नंदूरबार धोकेदायकनाशिक परिक्षेत्राचा आढावा घेतला तर जळगाव व नंदूरबारची कामगिरी फारसी चांगली नाही. निवडणुकांच्यावेळचे अनुभव विचित्र आहेत, त्यामुळे त्याची खबरदारी घेऊन कामकाज करा. लोकसभा निवडणूक ही आव्हान आहे. अनेक अधिकारी नव्याने दाखल झालेले आहेत, मात्र त्यांनाही याआधीच अनुभव असेल. त्यांनी बारकाईने अभ्यास करावा. मतदान केंद्र, शंभर मीटरचे, अंतर, केंद्र स्तरावरील स्थिती याची आतापासूनच माहिती करुन घ्यावी.पोलीस अधीक्षकांचा नाही पोलीस ठाण्याचा कागद तपासणारजिल्ह्यातील गुन्हेगारीचा इतिहास स्थानिकांना माहिती आहे. त्यामुळे कोणत्या गुन्हेगारावर कोणती कारवाई करावी, हे प्रभारी अधिकाºयांनी ठरवावे. कागदावरची आकडेवारी प्रत्यक्षात उतरली पाहिजे. त्यामुळे मी यापुढे पोलीस अधीक्षकांनी पाठविलेला कागद तपासणार नाही तर थेट पोलीस स्टेशनने तयार केलेला अहवाल व झालेली कारवाई तपासणार आहे. त्यामुळे वारंवार गुन्हेगारांची खात्री करा.त्यात एखादी गुन्हेगार सुटला तर मग अधिकाºयाने कारवाईसाठी तयार रहावे असे दोरजे म्हणाले.शस्त्रांचा वापर आवश्यकपिस्तुल, बंदूक, लाठी, काठी, ढाल, गॅस गन हे कुठे आहे. त्याचा वापर कसा करावा याचीही माहिती आताच करुन घ्यावी. निवडणूक काळात काही घटना घडली तर ऐनवेळी साधनसामुग्रीचा वापर करताना गोंधळ होऊ शकतो. गॅस गनचा कसा वापर करावा याचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाºयांनी आताच घ्यावे अशा सूचनाही दोरजे यांनी केल्या. दोरजे यांनी अनेक मुद्यांना स्पर्श करुन अधिकाºयांना सूचना केल्या.
गुन्हेगार सुटल्यास प्रभारी अधिकाऱ्याची खैर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:02 AM
विशेष पोलीस महानिरीक्षकांचा इशारा
ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांना शस्त्राचे प्रशिक्षण द्या