ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 14 - शहर व जिल्ह्यात पुरेसे मनुष्य बळ असून त्यासोबत पुरेसी जागा, वेळेवर कामे मार्गी लागणे तसेच आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास जळगावातील औद्योगिक क्षेत्रात भरभराट येण्यास मदत होईल, असा विश्वास सहकारी औद्योगिक वसाहतीच्या पदाधिका:यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात शुक्रवारी सहकारी औद्योगिक वसाहतीच्या पदाधिका:यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी पदाधिका:यांनी विविध विषयांवर चर्चा करून विकासाच्या दिशेने कशी वाटचाल करता येईल, यावरही प्रकाश टाकला. या वेळी सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन लक्ष्मीकांत चौधरी, व्हाईस चेअरमन सुमीत काबरा, संचालक आशीष पाटील, रुपेश लुंकड, नीलमचंद जैन, व्यवस्थापक चिंतामण पाटील उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
रस्ते, गटारींची मोठी समस्यासंपूर्ण औद्योगिक वसाहत परिसरातच रस्ते व गटारींचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे उद्योजकांना सतत या समस्यांना तोंड द्यावे लागते. हीच समस्या सहकारी औद्योगिक वसाहतीच्या 133 भूखंडावर असल्याने येथील 66 उद्योगांनाही याचा फटका बसतो. रस्त्यांअभावी मालाची ने-आण या दळणवळणाच्या बाबतीतच समस्या असल्याने ब:याचवेळा मालावर परिणाम होतो. या सोबतच गटारींअभावी पाण्याचा निचरा होत नसल्याने त्याचाही बिकट प्रश्न असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.
पथदिव्यांचा खर्च संस्थाच करतेसहकारी औद्योगिक वसाहतीच्या परिसरात पथदिव्यांअभावीदेखील अडचणी येतात. रात्रीच्या वेळी सतत अंधाराचा सामना करावा लागतो व चोरीच्याही घटना घडत असतात. यामुळे यावर संस्थेच्या पदाधिका:यांनीच मात करीत स्वत: खर्च करून येथे पथदिवे बसवून घेतले. इतकेच नव्हे त्यांची देखभाल, दुरुस्तीचा खर्चही पदाधिका:यांच्यावतीने करण्यात येतो.
अधिका:यांची सकारात्मकता आवश्यकऔद्योगिक वसाहत परिसरातील काही समस्या अधिका:यांकडे मांडल्या तसेच कोणत्याही कामासाठी कागदपत्रे सादर केली तर त्यावर तातडीने कार्यवाही होत नसल्याची खंत या वेळी व्यक्त करण्यात आली. या कामांसह अतिक्रमण असो अथवा इतर कोणतेही काम त्याबाबत सकारात्मकता दाखविली जात नाही. या समस्या मार्गी लावल्यास बराच फरक पडू शकतो, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.
कायम स्वरुपी अधिकारी हवाऔद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय धुळे असून त्यांचे अधिकारी जळगावात केवळ एकच दिवस येतात. काही काम असल्यास बहुतांश उद्योजकांची त्यांच्याशी विविध कारणांनी भेट होऊ शकत नाही. त्यामुळे जळगाव येथे कायमस्वरुपी अधिकारी असल्यास येथील समस्या दूर होण्यास मदत होईल,असा ही सूर यावेळी उमटला.
विमानसेवा, चौपदरीकरणामुळे भरभराटीची आशाऔद्योगिक विकास ठप्प झाला आहे, असे म्हटले जाते. मात्र जळगावात पुरेसी जागाच नसल्याने अनेक उद्योग येथे येऊ शकत नाही. या सोबतच कोणी यायला तयार झाले तरी आजूबाजूच्या जिल्ह्यात उद्योग नेल्याचे अनुभव असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यासाठी त्या-त्या ठिकाणची राजकीय मंडळी उद्योग त्यांच्या भागात नेत असतात. मात्र जळगावात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली. विमानसेवा, चौपदरीकरण हे अगोदरच व्हायला पाहिजे होते, मात्र आता या सेवा होत असल्याने उद्योगास चालना मिळेल, अशी आशा या वेळी व्यक्त करण्यात आली.
56 वर्षापासून संस्थेचे कामकाजसहकारी औद्योगिक वसाहतीची 1961मध्ये स्थापना करण्यात आली. त्यावेळी राजाभाऊ मंत्री, पी.आर. पाटणकर, तुकाराम चौधरी, त्र्यंबक मराठे, दगडू पाटील, शांतीलाल रायसोनी या संस्थापक सभासदांनी पुढाकार घेत ही संस्था उदयास आणली. तेव्हापासून उद्योगांसाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या भूखंडामध्ये सध्या दालमिल, औषधी, इलेक्ट्रिक, ऑईलमिल्स, फर्निचर, केमिकल असे विविध उद्योग आहेत.
25 वर्षापासून बिनविरोधची परंपरासंस्थेचे 13 संचालक असून 782 सभासद आहेत. गेल्या 25 वर्षापासून सामंजस्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध असल्याची परंपरा आहे.