dmi 953
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरणतर्फे दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेला मीटर रिडींग घेतले तर ग्राहकांना नियमानुसार बिल येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अनेक भागांमध्ये दिलेल्या तारखांना मीटर रिंडीग घेण्यात येत नसल्यामुळे, ग्राहकांना रिडींग घेण्याची तारीख गेल्यानंतर सरासरी वीजबिल देण्यात येत आहे. परिणामी यामुळे ग्राहकांना जादा बील येत देण्यात येत असून, मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी महावितरणतर्फे ग्राहकांना मार्च ते जून दरम्यान सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, देण्यात आलेले सरासरी वीजबिल हे अवाजवी असल्याच्या हजारो ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, देण्यात आलेले वीजबिल हे योग्यच असल्याचे सांगत, महावितरणने नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाभरात तक्रार निवारण शिबिरे घ्यावी लागली होती. गेल्या वर्षी सरासरी वीज बिलांमुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर, यंदा पुन्हा महावितरणतर्फे दर महिन्याच्या ठराविक तारखेला रिडींग न घेता, तारीख गेल्यानंतर रिडींग घेण्यात येत आहे. परिणामी यामुळे विजेचा दर दुप्पट होऊन ग्राहकांना जादा वीज आकारून येत आहे. तसेच काही वेळा तारखेनुसार रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी जादा बिल देण्यात येत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने ग्राहकांना वीज बिला पोटी होणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेणारा, ग्राहकांचे तारखेनुसार रिडींग न घेणाऱ्या एजन्सी धारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांमधून केली जात आहे.
इन्फो :
१) महावितरणचे ग्राहक
घरगुती - ६ लाख ८६ हजार ४०१
कृषी - २ लाख १९ हजार २८२
औद्योगिक - २४३
इन्फो :
- १०० युनिट पर्यंत ३ रुपये ४४ पैसे वीजदर
महावितरणतर्फे ज्या ग्राहकांचे १ ते १०० पर्यँत युनिट फिरले आहेत. त्या ग्राहकांना प्रति युनिट
३ रुपये ४४ पैसे वीजदर आकारला जात आहे. तर १०० युनिटच्या पुढे गेलेल्या ग्राहकांना वेगळा वीज दर आकारला जात आहे.
इन्फो :
१०१ पासून ते १६०युनिट पर्यंत ७ रुपये ३४ पैसे वीजदर
महावितरणतर्फे ज्या ग्राहकांचे १०१ ते १६० पर्यंत युनिट फिरले आहेत, त्या ग्राहकांना ७ रुपये ३४ पैसे या प्रमाणे वीजदर आकारण्यात येत आहे. विशेष हा वीजदर ३०० युनिट पर्यंत कायम राहत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
कुठल्याही विजबिलावर सबसिडी नाही
महावितरणतर्फे ग्राहकांचे जितके युनिट फिरले, तितकेच वीज दराच्या नियमानुसार वीज बिल आकारण्यात येते. कुठल्याही वर्गवारीतील ग्राहकांना विजबिलात कुठल्याही प्रकारची सबसिडी दिली जात नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
पूर्वी दर महिन्याला तारखेनिहाय रिडींग घेतल्यानंतर, त्या वीजबिल यायचे. मात्र, आता काही महिन्यांपासून ठराविक तारखेला रिडींग न घेता, तारीख गेल्यानंतर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे जास्त विजबिल येत आहे. तसेच विजबिलाची मुदत संपल्यानंतर वीज बिल देण्यात येत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.
अविनाश सावदेकर, ग्राहक
महावितरणतर्फे बऱ्याच वेळा घरी रिडींग न घेताच सरासरी वीज बिल देण्यात आले आणि ते वीज बिल देखील जादा देण्यात आले. यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
प्रवीण वाणी, ग्राहक
इन्फो :
महावितरणतर्फे प्रत्येक ग्राहकाचे दिलेल्या तारखेलाच रिडींग घेतले जाते. कधीतरी काही समस्या आल्यास एक ते दोन दिवस रिडिंगची तारीख मागे-पुढे होते. तसेच याचे कुठलेही जादा बिल ग्राहकांना दिले जात नाही.
फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण