जळगाव : जिल्ह्यात 16 फेब्रुवारी रोजी होणा:या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक व सरकारी कर्मचारी या काळात निवडणूक प्रचाराचे काम करताना आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. तसेच पोलिसांना या संबंधीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यावल तालुक्यातील भालोद या ठिकाणी झालेल्या घटनेच्या पाश्र्वभुमीवर पांडेय यांनी हे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत परिसर व आरोग्य केंद्र परिसरात जर निवडणुकीच्या प्रचाराचे फलक लावण्यात आले असतील तर ते फलकदेखील काढण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत. 4दरम्यान, भालोदच्या घटनेनंतर शनिवारी आस्तिककुमार पांडेय यांनी पंचायत समितीच्या मुख्यालयात विचारणा केली असता यावलचे गट विकास अधिकारी हे मुख्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित गट विकास अधिका:याला सोमवारी ही नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती पांडेय यांनी दिली.
अधिकारी व कर्मचारी प्रचार करताना आढळल्यास गुन्हा दाखल करणार
By admin | Published: January 16, 2017 12:36 AM