इंग्लंडच्या जर्सीवर आला लाल रंग
लंडन : इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी लॉर्ड्स कसोटी सामन्यात विशेष लाल रंगाने नंबर लिहिलेली जर्सी वापरली आहे. ही जर्सी त्यांनी रुथ स्ट्रॉस फाऊंडेशनला सहकार्य करण्यासाठी घातली आहे. ही संस्था फुफ्फुसांच्या कर्करोगाबद्दल जागृती करत असते. तसेच भारतीय खेळाडूंनीदेखील लाल रंगाची टोपी डोक्यात घातली. ही संस्था इंग्लंडचा माजी खेळाडू अँड्र्यु स्ट्रॉस याने त्याची पत्नी रुथ हिच्या स्मरणार्थ सुरू केली आहे.
उन्मुक्त चंद भारताकडून निवृत्त, अमेरिकेकडून खेळणार
नवी दिल्ली : फलंदाज उन्मुक्त चंद याने वयाच्या २८ व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने २०१२ मध्ये १९ वर्षाआतील क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते, या संघाने विजेतेपद पटकावले होते. आता तो अमेरिकेच्या संघाकडून खेळू शकतो. त्याने ६७ प्रथम श्रेणी सामन्यात, १२० लिस्ट ए आणि ७७ टी २० सामने खेळले आहेत.