फैजपूर : किसी ने खीलाया तो खाते है, किसीने गाडी मे बिठाया तो बैठते है नही तो पैदल निकल पडते है... अशी व्यथा आहे सुरत (गुजरात) मध्ये काम करणाऱ्या मजुरांची. सध्या ते गावाकडे म्हणजे झाशी (उत्तर प्रदेश) कडे पायी निघाले आहे. या आठ मजुरांना रविवारी फैजपुरात अडविण्यात आले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांना जेवणही दिले.पालिकेच्या मुन्सिपल हायस्कूलमध्ये काही वेळ राहण्याची व्यवस्था करून हायस्कूल ार्फे त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर य्पालिकेच्या डॉ. रेखा पाटील यांनी तपासणी केली असता त्यांच्यात कोरोनाची कुठलीच लक्षणें नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र लांबून पायी चालत आल्याने पायाला सूज आली आहे त्यासाठी त्यांना औषधी देण्यात आली. हे तरुण गेल्या शनिवार पासून गुजरात कडून पायी निघाले आहेत.
किसी ने खीलाया तो खाते है
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:22 PM