महामार्गावर जास्त अपघात
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. मुसळी फाटा ते नशिराबाद या दरम्यान सर्वाधिक अपघात झालेले आहेत. खड्डे, साईडपट्टी खराब यासह ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन डोक्याला मार लागून मृत्यू झालेला आहे. काही घटनांमध्ये मद्यप्राशन करुन वाहन चालविल्याने अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. शहरापासून नजीक असलेल्या ग्रामीण भागातही अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयात अपघातातील जवळपास ९० टक्के रुग्ण हे डोक्याला मार लागलेले असतात. डोक्यात व मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यातच असतो. तात्काळ उपचार मिळाले तर जीव वाचतो. हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांचा जीव वाचलेला आहे.
- सचिन अहिरे, ऑर्थोपेडीक
दुचाकींचे अपघात
महिना अपघातजखमीमृत्यू
जानेवारी ६७ ४० ३९
फेब्रुवारी ६४ ४३ ४७
मार्च ५१ २८ २२
एप्रिल २२ १० १९
मे ५० २० ३५
जून ५९ २५ ४३
जुलै ५७ १९ ४७
ऑगस्ट ६३ ४२ ४४
सप्टेंबर ५८ ३९ ३९
ऑक्टोबर ६६ ३४ ३३