जळगाव : बारावीच्या परिक्षेत कोळगावला ‘कॉप्यांचे’अक्षरश: आभाळ फाटले. या केंद्रावरील सामूहिक कॉपीचा प्रकार राज्यभरात गाजत आहे. या पुढे कुठल्याही केंद्रावर पुन्हा असा प्रकार घडल्यास आपण स्वत: येऊन केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल करु, अशी तंबी महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी रविवारी केंद्र संचालकांच्या बैठकीत दिली.दहावीच्या परीक्षांना उद्यापासून सुुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयात केंद्र संचालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माध्यामिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे उपस्थित होते. बैठकीत उपासनी यांनी इयत्ता १२ वीच्या पहिल्याच पेपरपासून, जिल्ह्यात सुरु असलेल्या कॉपीच्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात १२ वीच्या चार पेपरांमध्ये आतापर्यंत कॉपीच्या १३ केसेस घडल्या आहेत. कॉपीच्या प्रकारामुळे नियमित अभ्यास करुन, परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत असून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षकांनी यांची गंभीरदखल घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.तर कॉपीच्या प्रकाराला केंद्र संचालकच जबाबदार-परिक्षा सुरु होण्याच्या आधी विद्यार्थ्यांची तपासणी करुनच परीक्षा केंद्रावर सोडावे. तपासणी वेळी जी कॉपी आढळेल, ती कॉपी लगेच बाहेरचं जाळून टाकावी. असे असतानांही भरारी पथकाला एखादी विद्यार्थी कॉपी करतांना आढळल्यास, या प्रकाराला केंद्र संचालकच जबाबदार असल्याची माहिती नितीन उपासनी यांनी यावेळी दिली.-परिक्षा काळात संबंधित केंद्रांची जबाबदारी ही केंद्र संचालकाचींच असते. जर केंद्र संचालकांनी ठरवले, तर एकही विद्यार्थ्याला कॉपी करता येणार नसून, १० वीची परिक्षा १०० टक्के कॉपीमुक्त करता येणार असल्याचे सांगितले.कुणालाही फोन करा, कारवाई होणारचकोळगावच्या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मास कॉपीचा प्रकार घडणे, ही गंभीर बाब आहे. इथल्या कॉपीचा प्रकार राज्यभरात गाजत आहे. बºयाचदां संस्थेच्या राजकीय दडपशाहीखाली केंद्रसंचालक काम करत असल्यामुळे असे प्रकार घडतात. मात्र, या गैरप्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे.
कॉपीचा प्रकार घडल्यास स्वत: गुन्हा दाखल करणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:16 PM