जळगाव : चोपडा येथील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तहसील कार्यालयातील कर्मचाºयास अरेरावी आणि धमकी दिल्याचा आॅडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे चोपडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.माजी आमदार आणि संबंधित कर्मचारी यांच्यातील व्हायरल झालेला संवाद असा आहे....सोनवणे - कार्यकर्त्याशी नीट बोलत जा ना..कर्मचारी - मी तर कोणाशी वाईट बोलत नाही..सोनवणे - तक्रार आली आहे तुझी..वात्रू नको जास्त, माझ्या शालकालापण फिरवतो तु, लाज वाटते का तुला..दाखवू तुला आमदारकी काय राहते तर..गणेश बंद कर दरवाजा..दाखवू का तुला, ***** कर्मचारी आहे ना तू..(तू का ठोकले नाही रे याला..कार्यकर्त्याला संबोधून)कर्मचारी - मी काही बोललो नाही की काम करून देणार नाही (कार्यकर्त्यांशी संबोधून)सोनवणे - काय अडचण आहे तुला..आता तक्रारच येवू दे *** ठोकतोच तुला ..वातरु नको जास्त..शालकाला काय बोलला तू माझ्या...कर्मचारी - त्यांना काय म्हटलं, की आपण नवीन रेशनकार्ड काढू, जुन्या कार्डात नाव नका टाकू,सोनवणे - लाज वाटू दे ***, याच्यापुढे तक्रार येवू दे मग पाहतोच तुला दादागिरी काय असते तर , अन्यथा बदली करून घे तुझी...कर्मचारी - दादागिरी नाही सर, जे चांगले काम आहे ते मी काम करतो..सोनवणे - किती पैसे घेतो तुकर्मचारी - कधीही मी पैसे घेत नाही मी, सांगून द्यावे कोणीसोनवणे - तुला सांगतो ...मी जेव्हा सापडेल तेव्हा पाहून घेतो..कार्यकर्त्यांशी नीट वागला नाही तर पाहतोच तुला...कर्मचारी - कार्यकर्त्याने व्यवस्थित काम आणले तर काम करेल न मी..सोनवणे - कार्यकर्त्यांचे काम झालेच पाहिजेकर्मचारी - एजंट कार्यकर्त्यांचे नाव सांगून चुकीचे काम करतातसोनवणे - कोणी सांगितले, नंतर तक्रार आले तर पाहतोचकर्मचारी - चुकीचे काम आले तर मी स्वाक्षरी करणार नाहीसोनवणे -त्या अण्णाच्या नावावर काय सांगत होता हाकर्मचारी - कोणालाच फिरवलेच नाहीसोनवणे - सगळ्यांना फिरवतो तू ******* आमदाराच्या भावाला फिरवतो तू **** आता तक्रार आली तर ... मार खाशील..कर्मचारी - मी कोणालाही फिरवलं नाही सरसोनवणे - याच्यापुढे तक्रार येवू दे.. जास्त ....आहेत तुम्ही रेशनिंगमध्ये काय काम करतात...माहिती आहे मला...शेवटची वार्निंग देतो तुम्हाला .... असा संवाद यात झडला आहे.
कार्यकर्त्यांशी नीट वागला नाही तर पाहतोच तुला...... काय म्हणाले आमदार चंद्रकांत सोनवणे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:37 PM