मुक्ताईनग / जळगाव : २५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला उद्धव हे तू करणार नसेल तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते म्हणून ही जवाब दारी घेतली जनतेच्या मनातलं हे सरकार आहे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुक्ताईनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी केले. सरकार पाडून दाखवाच असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले.मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीतर्फे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन शहरातील एस.एम.कॉलेज जवळील मैदानावर करण्यात आले होते. मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर व्यासपीठावर कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार रावसाहेब शेखावत, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदिप पाटील, कॉँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष हितेश पाटील, राजेश वानखेडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालन करण्यात आले.--कर्जमुक्तीपासून कारकिर्दीला सुरूवातआपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, या सरकारचा पहिला मोठा निर्णय म्हणजे दोन लाखापर्यंत कर्ज असलेला शेतकऱ्याची कर्जमुक्ती हा होय. लवकरच दोन लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणाºया शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करणे हा असेल. महिलांसाठीही योजना भविष्यात असेल.---चंद्रकांत पाटील हुशार वाघमुक्ताईनगर तालुक्यात वाघाचा आधीवास आहे वाघ माझ्या अवतीभोवती असतात पण चंद्रकांत पाटील हे हुशार वाघ निघाले तिन्ही पक्षाचे झेंडे येथे त्यांनी एकत्र आणले असे उद्धव ठाकरे म्हणताच एकच हंशा पिकला मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्रात व्याघ्र प्रकल्प मागणी पहिल्यांदा पूर्ण करेल आणि एसटी डेपो लगत व्यापारी संकुल प्रश्न लवकरच सोडवू हे माझे वचन असल्याचेही ठाकरे म्हणाले.मुक्ताईनगर मुक्त झालेमुक्ताईनगर हे खºया अर्थाने मुक्त झाले, मुक्त झाले कशा पासून कोना पासून हे तुम्हाला ठाऊक आहे असे माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणताच एकच हंशा पिकला.हिंमत असेल तर सकार पाडाविरोधक म्हणतात लवकरच आॅपरेशन लोटसने सरकार पडेल, एप्रिलमध्ये सरकार पडेल... अरे नुसते बोलतात काय? हिंमत असेल तर आजच सरकार पाडून दाखवा असे आव्हानही त्यांनी दिले. जनतेने तुम्हालाच लोटलं असा टोलाही त्यांनी मारला.---राज्यात सरकाची आगेकुचनिव्वळ शेती वर नाही तर कारखानदारी ही आवश्यक त्यातूनच रोजगार निर्मितीसाठी चालना मिळते असे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्टÑवादी कॉँग्रसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले. एकबाजूने शेती व दुसºया बाजूने औद्योगिक विस्तार आवश्यक असल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आगेकूच करीत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.-----उद्धव ठाकरे उत्कष्ट फोटोग्राफरमहाराष्ट्रातील वाघाची माहिती घायची असेल तर ती उद्धव ठाकरे यांच्याकडून ते उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. मुक्ताईनगरच्या जंगलात दहा वाघ असल्याचे आपणास चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याभागासााठी उद्धव ठाकरे यांनी चद्रकांत पाटील हा चांगला वाघ निवडल्याचेही ते म्हणाले.. यावर एकच हंशा पिकला. बचत गटाची चळवळ या भागात वाढवायला पाहिजे मुक्ताईनगर परीसरात कुºहा वदोडा, तळवेल आणि बोदवड उपसा सिंचन योजनांसाठी निधी बाबत सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.----चाळीसवर्षापूर्वीची आठवणशेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी चाळीस वर्षांपूर्वीची आठवण सांगितले. त्यावेळी जळगाव ते नागपूर दरम्यान शेतकरी दिंडी दिंडी काढली होती. त्यावेळेस मुक्ताईनगर येथील लिलाधव पाटील हे शेवटपर्यंत आपल्या सोबत होते.---भाजपा नगराध्यक्षांनी केले स्वागतमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिपॅडवर मुक्ताईनगरच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष (भाजप) नजमा इरफान तडवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.---मी पाईपाने पाणी देणारखडसे यांचे नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पूर्वी चारीनेही ही मंडळी पाणी देऊ शकले नाही पण मी पाईपाने पाणी देणार आहे. मुक्ताईनगरला खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असल्याचा टोलाही त्यांनी मारला. पूर्वी जो अन्याय झाला तो आता होणार नाही. पूर्वी चार मंत्री होते. आता गाडी पलटी घोडे फरार अशी स्थिती आहे. मी एकटा मंत्री असल्याचे ते म्हणाले. मोठे डाकु होते पण मी घाबरलो नाही असे गुलाबराव म्हणताच एकच हंशा पिकला.कृषि महाविद्यालयाची कामे मार्गी लावूयेथील कृषी महाविद्यालयाचे सर्व प्रश्न मार्गी लावू असे कृषी मंत्री दादा भूसे यांनी सागितले. केळी संशोधन केंद्र लहान आहे त्याचा विस्तार करू तसेच केळीस फळ पिकाचा दर्जाही मिळेल असे ते म्हणाले.एकत्र आलो म्हणून यशआमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. तिघे एकत्र आलो म्हणून यश मिळाले, तेच समिकरण नंतर राज्यात राबविले गेले. तालुक्यासाठी महत्वाकांक्षी बोदवड उपसा व इतर सिंचन योजनांना मदत केल्यास हा जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. येथे जागा असल्याने एमआयडीसी मंजूर करावी, केळी निर्यात केंद्र व्हावे, केळी संशोधन केंद्र व्हावे यासाठी मदतीची अपेक्षा त्यांनी केले.या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.
हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 10:12 PM