जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दररोज आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणेला जाग येत नसल्याचे चित्र शहरात आहे. पाच लाख लोकसंख्येच्या शहरासाठी केवळ ७२ कर्मचाऱ्यांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी आहे. तसेच धूर फवारणीसाठीदेखील केवळ १४ मशीन असल्याने शहरातील बहुतांश भागात फवारणी होतच नसल्याचे चित्र आहे.शहरात गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांनी मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यातच पावसामुळे घराशेजारी तसेच इतरत्र साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. सध्यादेखील दररोज तीन ते चार डेंग्यूचे रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खाजगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांसह महिला, तरूण, वृद्ध यांना डेंग्यूची लागण असून असे जवळपास ४०च्यावर डेंग्यूचे रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली.प्रचंड अस्वच्छताशहरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परिसरात तर प्रचंड घाण झाली आहे. कचºयाचे ढीग साचले आहेत. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नाही.फवारणी नाहीडेंग्यूच्या नियंत्रणासाठी मनपाच्या पथकात २४ कायम कर्मचारी असून ७२ इतर कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र कायम कर्मचाºयांपैकी दररोज सरासरी २० कर्मचारी तर इतर ७२ पैकी ५२ कर्मचारी कामावर असतात. प्रत्यक्षात २०० मजुरांची आवश्यकता असताना केवळ ७२ कर्मचाºयांवर डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी मनपाने दिली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या सोबतच १६ पैकी केवळ १४ धूर फवारणी मशीन सुरू असून एवढ्या मोठ्या शहरासाठी त्या कमी पडत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील दहा भागांची पाहणी केली असता एकाही भागात फवारणी झाली नव्हती.शहरात जागोजागी कचºयाचे ढीगशहरात डेंग्यूसह विविध आजार पसरत असतानाही शहरातील साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा क्रीडा संकुल परिसरासह अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून त्यामुळे डासांची संख्याही वाढत आहे. जिल्हाधिकारी, महापौरांचे बंधू, उपमहापौर यांना डेंग्यू झाल्यानंतरही मनपाने यातून काही धडा घेतला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे फवारणी होत नसताना किमान साफसफाई तरी व्हावी अशी मागणी होत आहे.ज्या भागात डेंग्यूची तक्रार येत आहे अथवा सूचना मिळत आहे त्या भागात नियमित फवारणी, अॅबेटिंग केले जात आहे.- एस.व्ही. पांडे, जीवशास्त्रज्ञ, आरोग्य विभाग, मनपा.डेंग्यूच्या नियंत्रणासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. यासाठी एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. डासांची उत्पत्ती असणाºया ठिकाणी थोडे रॉकेल अथवा डिझेल टाकावे, पाणी व द्रव पदार्थाचे जास्त सेवन करावे.- डॉ. हेमंत पाटील, बालरोग तज्ज्ञ
जळगावात डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:26 PM
फवारणी होईना
ठळक मुद्देदिवसागणिक वाढतेय रुग्ण संख्याडेंग्यू नियंत्रणासाठी ७२ कर्मचारी