चोपडा - मोटरसायकलवरून अवैध दारूची वाहतूक करताना बुधवारी दुपारी एकास रंगेहात पकडण्यात आले. यावेळी संबंधितांकडून देशी दारूच्या २२० बाटल्या व मोटरसायकल असा ३१ हजार ५०० रूपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी आरोपीस अटक केली.चोपडा शहरातील थाळनेर दरवाजा चौकात एक जण मोटर सायकल वरून अवैध दारूच्या बाटल्या घेऊन येत असल्याची गुप्त माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पीएसआय रामेश्वर तुरनर, पोलीस नाईक संतोष पारधी, पो.कॉ.प्रकाश मथुरे यांनी सकाळी ११ वाजता शहरातील थाळनेर दरवाजा भागात सापळा रचून अनिल मुन्नीलाल पटेल (वय-२३) रा. जबलपूर ता. लखमादौम जि.शिवणी ( मध्य प्रदेश ) हल्ली मुक्काम अरुणनगर चोपडा हा विना क्रमांकाच्या मोटर सायकलवर टँगो पंच देशी दारूच्या २२० बाटल्या घेऊन येत असताना पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडून कारवाई केली. यावेळी अनिल पटेल यांच्या कडून ११ हजार ४४० रुपये किंमतीची देशी दारू व २० हजार रुपये किंमतीची मोटर सायकल पोलिसांनी जप्त केली.याबाबत पो.कॉ.प्रमोद पवार यांच्या फिर्यादीवरून अनिल मुन्नीलाल पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष पारधी करीत आहेत.
चोपडा येथे दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:10 AM