लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.६- आघाडी सरकारच्या काळात नेत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना चुकीच्या पद्धतीने कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यात आला असल्याच्या आरोपांचा पुनरूच्चार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवार, दि.६ रोजी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. राष्टÑवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आलेल्या महाजन यांना पत्रकारांनी गाठले. महाजन यांच्या आरोपांवर स्व.आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी पुरावे द्या, अथवा आर.आर.आबांच्या समाधीवर येऊन माफी मागा असे आव्हान दिले आहे. त्याबाबत विचारणा केली असता महाजन यांनी आरोपांचा पुनरूच्चार करीत मुंबईत गेल्यावर पुरावे सादर करणार असल्याचे सांगितले. आघाडी सरकारच्या काळात नेत्यांना चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी दिली गेल्याचा आरोप जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेप्रसंगी केला होता. त्यात राष्टÑवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांच्या बंधूंना तब्बल ८० लाख रूपयांचे कर्ज माफ झाल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे स्व.आर.आर.पाटील यांच्या कन्या व राष्टÑवादी युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील यांनी महाजन यांनी पुरावे सादर करावेत. अन्यथा आर.आर.आबांच्या समाधीवर येऊन माफी मागावी, असे आव्हान दिले आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी महाजन यांना विचारणा केली असता सुरूवातीला त्यांनी बोलणे टाळले. पुरावे आहेत. असे सांगितले. त्यावर मग पुरावे द्या, असे सांगितल्यावर मुंबईत गेल्यावर पुरावे सादर करणार आहोत, असे सांगत त्यांनी आघाडी सरकारच्या काळात नेत्यांना चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी दिली गेल्याच्या आरोपांचा पुनरूच्चार केला. सर्व नेत्यांची नावेच आपण जाहीर करणार आहोत. तसेच विदर्भात कुणी गाई-म्हशीसाठी चुकीच्या पद्धतीने अनुदान लाटले, त्याची माहितीही जाहीर करणार असल्याचे सांगितले. दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा प्रयत्न आघाडी सरकारच्या काळात ज्या पद्धतीने चुकीच्या लोकांनाही लाभ दिला गेला, तो प्रकार टाळण्याची खबरदारी युती सरकार घेत असल्याचे सांगून महाजन म्हणाले की, दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
आघाडी सरकारच्या काळातील नेत्यांच्या कर्जमाफीचे पुरावे मुंबईत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:02 PM
गिरीश महाजन आरोपांवर ठाम: दिवाळीपूर्वी शेतकºयांना कर्जमाफीचा प्रयत्न
ठळक मुद्देआरोपांचा केला पुनरूच्चारनेत्यांना चुकीच्या पद्धतीने मिळाली कर्जमाफी