दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : गायरान जमिनीवर दीपनगर प्रकल्पातील अवैध मुरुमसाठा टाकल्याप्रकरणी जागेची पाहणी मंडळाधिकाऱ्यांनी केली.येथील औष्णिक विद्युत केंद्र ६६० मेगावॅट नवीन निर्मिती प्रकल्पाचे काम लॉकडाऊनलोडमुळे बंद ठेवण्यात आले होते. लॉकडाऊन काही प्रमाणात स्थिर झाल्याने प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत परवानगी मागितली. नियमांना अधीन राहून कामाला जिल्हाधिकाºयांकडून परवानगी देण्यात आली होती. त्यातील मुरूम व माती वर्षांपासून पिंपरीसेकम परिसरातील गायरान जमिनीवर अवैध मुरूम साठा टाकण्यात आला. परिणामी गुराढोरांना उपासमारीची वेळ आली. याबद्दल ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच दखल घेत वरणगाव येथील मंडल अधिकारी योगिता पाटील यांनी पिंपरीसेकम येथील घटनास्थळी जाऊन जमिनीची पाहणी करुन जागेचा पंचनामा करण्यात आला. योग्य ती कारवाई लवकरच केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
गायरान जमिनीवर अवैध मुरुमसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 3:36 PM
गायरान जमिनीवर दीपनगर प्रकल्पातील अवैध मुरुमसाठा टाकल्याप्रकरणी जागेची पाहणी मंडळाधिकाऱ्यांनी केली.
ठळक मुद्दे जागेची मंडळाधिकाऱ्यांकडून पाहणीजागेचा केला पंचनामा