सावखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : अवैध रेती वाहतुकीविरोधात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महसूल विभाग झाला जागा झाला अन् एका ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात आली.या अगोदर तालुक्यात महसूल विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस गस्त घालूनसुद्धा वाळूचोरी मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्या अनुषंगाने १२ रोजी रात्री महसूल विभागाच्या पथकाने रात्री साडेअकरा वाजता कुंभारखेडा येथे अवैध रेती वाहून नेताना ट्रॅक्टर चालकाला पकडून ट्रॅक्टरचा पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालय रावेर येथे जमा करण्यात आले व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही अशीच कारवाई अवैध रेती वाहतूक व उत्खनन करणाऱ्यांविरोधात होत राहील, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.यावर्षी वाळू घाटांचे लिलाव नसल्याने मिळेल त्या ठिकाणची वाळू उचलण्याचे प्रकार व रेती अव्वाच्या सव्वा भावात विकण्याचे प्रकार परिसरातील नदीपात्रात सुरू होते. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. पण महसूल विभागाच्या या रात्रीच्या कारवाईने अवैध रेती वाहणाºया वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूवीर्ही अवैध रेती वाहतूक की विरोधात वेळोवेळी महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने कुंभारखेडा, चिनावल, सावखेडा, लोहारा ,खिरोदा परिसरात महसूल विभागाकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे.मंडळाधिकारी संदीप जैस्वाल, प्रदीप आडे, अजय महाजन, पी.पी.नायदे, हनिफ तडवी, उमेश बाभुलकर, तेजस पाटील, समीर तडवी, प्रवीण वानखेडे या महसूल विभागाच्या पथकाने रात्री कुंभारखेडा येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले.
कुंभारखेडा येथे अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 3:38 PM
अवैध रेती वाहतुकीविरोधात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महसूल विभाग झाला जागा झाला अन् एका ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्दे‘लोकमत’ वृत्ताची दखलचालकास आकारला दंड