जळगाव : शहरातून अवैध वाळूची तस्करी सुरुच असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री महामार्गावर शिवकॉलनी जवळ ताडपत्री झाकून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला. हा ट्रक जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून कारवाईबाबत पत्र देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सोमवारी रात्री काही कर्मचाऱ्यांची रात्रीची गस्त नेमली होती. त्यात जितेंद्र पाटील, प्रितम पाटील व नितीन बाविस्कर यांचा समावेश होता. हे तिघं कर्मचारी मंगळवारी सकाळी सहा वाजता शिवकॉलनी परिसरात असताना भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकमधून पाणी गळताना त्यांच्या निदर्शनास आले. या ट्रकला ताडपत्रीने झाकलेले होते. पथकाने त्याला अडवले असता त्यात तीन ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळूचा परवाना नव्हता. चालक सुभाष गडबड नन्नवरे (४६,रा.बांभोरी, ता.धरणगाव) याच्यासह ट्रक जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
ताडपत्री झाकून ट्रकमधून अवैध वाळू वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 6:57 PM