जळगाव : आमदार सुरेश भोळे यांना गुरुवारी सकाळी अपघात झाल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली आणि शुक्रवार सकाळीच तातडीने अपघात झालेल्या ठिकाणची गटार दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या ठिकाणी जेसीबीसह ठेकेदाराचे कर्मचारी दाखल झाले आणि कामालाही सुरूवात झाली. आमदार सुरेश भोळे यांची दुचाकी घसरल्याने ते खाली पडले आणि त्यात त्यांना मुकामार लागला. खड्डयांमुळे अपघात झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. मात्र, ‘लोकमत’ च्या टीमने शुक्रवारी अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी केली असता, त्या ठिकाणी खड्डा नव्हता. ृ मात्र, दोन महिन्यांपासून याच ठिकाणी गटारीच्या दुरुस्तीचे काम सुरु असून हा रस्ता खोदण्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सुश्रुत बर्न केअर सेंटरसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद असून कामिनी कमल हॉस्पिटल समोरच्या एका बाजूच्या रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरु आहे. याच रस्त्यावरून येत असताना अचानक आमदार भोेळे यांच्या दुचाकी समोर काही विद्यार्थी सायकलवरून आल्याने त्यांची दुचाकी घसरुन त्यांचा अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी महेश चौधरी (शिवाजीनगर) यांनी दिली.छटाकभर कामासाठी दोन महिन्यांचा काळ या रस्त्यावरील गटारीच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी रस्ता देखील खोदून ठेवण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम मात्र थांबले होते. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर कामाला वेग आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा काम थांबले होते. बहिणीच्या निधनानंतर आमदारांवर दुसरी आपत्ती १ सप्टेंबर रोजी आमदार सुरेश भोळे यांच्या भगिनी सुनंदा जंगले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाची आपत्ती कोसळली होती. त्या दु:खातून सावरत असताना अचानक गुरुवारी त्यांचा अपघात झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना आमदारांचा अपघात झाला. सुदैवाने त्यांना गंभीर इजा नसल्याने काही दिवस आराम केल्यानंतर पुन्हा कामाला लागू शकतात, असे डॉक्टरांचे मत आहे.
रिंगरोडवर सुरु असलेल्या कामाबाबत माहिती नाही, बांधकाम विभागाकडून कामाची माहिती मागविण्यात आली असून, काम थांबले असेल तर कामाला काय अडचणी याची माहिती घेतली जाईल.-डॉ.उदय टेकाळे, आयुक्त गटारीच्या कामास अनेकवेळा तांत्रिक अडचणी येत होत्या. सततच्या पावसामुळे काम सुरु होण्यास अडचण येत असतील. दरम्यान, आज ती अडचण दुर झाली असल्याने मक्तेदाराने काम सुरु केले असावे.-सुनील भोळे, बांधकाम अभियंताआमदार सुरेश भोळे यांचा अपघात हा खड्डयांमुळे झालेला नाही. पावसामुळे दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. तसेच रिंगरोड जे काम सुरु आहे ते काम तत्काळ सुरु करून पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरु असल्याने अनेकदा वाहतुकीला अडचण येते. -डॉ.अश्विन सोनवणे, उपमहापौर आमदार भोळे यांच्या छातीला मुकामार लागला आहे. डोक्यालाही जखम झाली आहे. त्यामुळे अजून तीन ते चार दिवस देखरेखीखाली ठेवावे लागणार आहे. चार दिवसानंतरच घरी जावू देण्यात येईल तरीही त्यांना काही दिवस आराम करावा लागेल.-डॉ.अर्जुन भंगाळे