जळगाव- विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे प्रेरणादायी कार्यक्रम राबविणे त्यासोबत उच्च महाविद्यालयीन शिक्षकांसाठी दरवर्षी अभ्यासक्रम व नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याकामी प्रशिक्षण राबवले गेले पाहिजे आणि त्याकरिता एआयसीटीई पुढाकार घेत असून विद्यापीठ अनुदान आयोग देखील पाऊले उचलत आहे, असे विचार एआयसीईटीचे चेअरमन डॉ़ अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले़केसीईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मू ़जे ़ महाविद्यालयाच्या प्रांगणात अमृत महोत्सव प्रकट कार्यक्रम पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे डॉ.भूषण पटवर्धन, डॉ.नितीन करमळकर, एन.के.ठाकरे ,डॉ.एस.एफ.पाटील,डॉ.आर.एस.माळी, डॉ.के.बी.पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, अॅड.प्रकाश पाटील ,सुरेश चिरमाडे, अॅड.सीताराम फलक, डी.टी.पाटील, डॉ.मीनाक्षी वायकोळे, हर्षवर्धन जावळे ,मंगेश सरोदे, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती़यांचा झाला गौरवकार्यक्रमाच्या सुरवातीला स्वरदा संगीत विभागाने ईशस्तवन सादर केले. अमृतमहोत्सवी वर्ष प्रतिक चिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीच्या ज्ञानजगत अंकाचे प्रकाशन, खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीच्या जेष्ठ सदस्यांचा गौरव करण्यात आला़ त्यामध्ये यात अॅड.व्ही.व्ही.सरोदे, डी.एस.नेमाडे, डॉ.देवराम नारखेडे, प्रा.पी.एल.कोल्हे, प्रा़ टी.आर.चिरमाडे, एन.जी.देवरे, एम.एम.झांबरे, ए.एस.चौधरी, व्ही,एन.चौधरी, डॉ.शुभदा कुलकर्णी, मुरलीधर वायकोळे, एस.एस.मणियार, अॅड.प्रविणचंद्र जंगले,आर.एन.पाटील यांचा समावेश होता़प्रमुख अतिथी डॉ. डॉ.भूषण पटवर्धन यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल आणि स्वायत्त महविद्यालय नवीन शैक्षणिक संधी याबद्दल आपल्या भाषणातून माहिती दिली.सर्वकष शिक्षण ,काव्यसंग्रह ,विनोद ,अध्यात्म यामुळे आदर्श महाविद्यालयाचा आदर्श खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीने घालून दिला आहे असे गौरोद्गार काढले. सूत्रसंचालन भाग्यश्री भलवतकर यांनी तर आभार डॉ.उदय कुलकर्णी यांनी मानले .