मुक्ताईनगर, जि. जळगाव : भविष्यातील पाणीटंचाई निवारणार्थ अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथे ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.संपूर्ण जळगाव जिल्ह्याला पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यात मुक्ताईनगर तालुकाही मागे नाही. आजच्या स्थितीत अंतुर्ली येथे गंभीर पाणीटंचाई नाही, मात्र भविष्यातील स्थिती पाहता ग्रामस्थांनी एकजूट केली आणि ग्राम पंचायतीच्या बाजूला असलेल्या दीपक कुलकर्णी यांच्या वाड्यात ग्रामस्थांची एकत्र बैठक घेतली.या बैठकीला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीचे आयोजन दीपक कुलकर्णी यांनी केले होते.पाणी अडवणे आणि जिरवणे तसेच परिसरात जास्तीत जास्त झाडे लावणे आणि जगवणे याविषयी चर्चा करण्यात आली. गावात ग्रामपंचायतीच्या ज्या ट्यूूबवेल आहेत त्या ठिकाणी शोषखड्डा करणे, परिसरातील भांमदार नाल्यावर जुना पूल आहे त्या ठिकाणीसुद्धा जास्तीत जास्त पाणी अडवले जाऊ शकते त्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच गावात व शेतात ज्या विहिरी बंद अवस्थेत असतील त्या ठिकाणी पाणी जिरवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.आता पुढील नियोजन आणि कार्य याविषयी लवकरच आढावा घेतला जाईल, असे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
पाणीटंचाई निवारणार्थ अंतुर्ली येथे महत्त्वपूर्ण पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 2:57 PM
मुक्ताईनगर, जि. जळगाव : भविष्यातील पाणीटंचाई निवारणार्थ अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथे ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्याला पाणीटंचाईने ग्रासले ...
ठळक मुद्देअंतुर्ली येथे जलसंकट निवारण करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतली बैठकपाणी अडविणे, जिरवणे यावर भर देणारबंद गावविहिर, ट्यूबवेलजवळ शोषखड्डे करणार