जळगाव : आठ वर्षीय बालिकेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी गैरकृत्य करणाºया दीपक अशोक पाटील (१९, रा.टाकळी बु.ता.पाचोरा) याला न्यायालयाने १ वर्ष ११ दिवस कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला. दरम्यान, यातील दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.पीडित बालिका दीपक याच्या घरासमोर झाडाचे बदाम वेचण्यासाठी गेली असता त्याने रॅकमधील डब्यावरील दगड काढ असे सांगून बालिकेला घरात बोलावून घेत गैरकृत्य केले होते. तपासाधिकारी पंकज शिंदे यांनी दोषारोपपत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने दीपक याला दोषी धरुन १ वर्ष ११ दिवस कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम भरली नाही तर सहा महिने जास्त कारावास भोगावा लागणार आहे. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला. या खटल्यात केसवॉच पोलीस शिपाई मनोहर पाटील व पैरवी अधिकारी अनिल सपकाळे यांनी मदत केली.
बालिकेशी गैरकृत्य करणाऱ्यास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:26 PM