शहरामध्ये पूर्वी तीन-चार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आता नियोजनशून्य कारभारामुळे उशिरा होत आहे. वरणगाव शहरासाठी ७ वर्षांपूर्वी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार झाली होती. ती पाणीपुरवठा योजना इतक्या कमी कालावधीमध्ये कालबाह्य झाली कशी, असा संतप्त सवाल नगर परिषद प्रशासनाला विचारण्यात आला आहे. तसेच तीर्थ क्षेत्र नागेश्वर मंदिराचे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भूमिपूजन करून पाया खोदकाम झालेले आहे. त्या कामाला पावसाळ्याआधी सुरुवात करावी. प्रभाग क्रमांक १८मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहाचे कामाची वर्क ऑर्डर जून २०२० मध्ये दिली असून, अजूनपर्यंत सभागृहाचे काम पूर्ण झालेले नाही. अशा विविध मागण्यांचे निवेदन वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर. पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, पप्पू जकातदार, मनोज कोलते, मनोज अग्रवाल, प्रकाश नारखेडे, समाधान चौधरी, कैलास माळी, माजी नगरसेवक विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, साजिद कुरेशी, राजेश चौधरी, महेश सोनवणे, विनायक शिवरामे, डॉ. एहसान अहमद, सोहेल कुरेशी, अनिल चौधरी, राजेश इंगळे, इफ्तेखार मिर्जा, शेख रिजवान, हिमालय भंगाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वरणगावला पाणीपुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:19 AM