गणेश हा त्याच्या कुटुंंबियांसह खंडेरावनगरात वास्तव्यास होता. सोमवारी सकाळी त्याचे आई-वडील, तसेच दोन्ही भाऊ व इतर नातेवाईक मनुदेवी तीर्थक्षेत्रावर गेले होते. यावेळी गणेश घरी एकटाच होता. कुटुंबीय सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतले असता, गणेश घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांत होणार होता नोकरीवर रुजू
गणेशला खाजगी बँकेचा नोकरीसाठी कॉल आला होता. काही दिवसांतच तो बँकेत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याने गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
गणेशच्या पश्चात आई सरला, वडील नरेंद्र बाविस्कर, भाऊ तुषार व दादू असा परिवार आहे. वडील नरेंद्र हे मजुरी करून उदरनिर्वाह भागवतात, तर दोन्ही भाऊ शिक्षण घेत आहेत.