जळगाव : शहरात चोरी, घरफोडी, सोनसाखळी लांबविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गुन्हेगारीच्या घटनांना लगाम लावण्यात मात्र पोलीस प्रशासनाल अपयश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास रामानंदनगर परीसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सामाजिक सामाजिक कार्यकर्ता वंदना पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेल्याची घटना घडली. रात्री उशिरा पर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
वंदना पाटील या शुक्रवारी रात्री ९ वाजता आपल्या दुचाकीने रामानंदनगर परिसरातून जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे दुचाकीने त्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर संधी साधून त्यांनी पाटील यांचा गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर पाटील यांनी तात्काळ रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा चोरट्यांचा चोरट्यांचा चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी घटनास्थळी येऊन चोरट्यांचा शोधात पथक रवाना केले.