शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
4
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
5
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
6
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
7
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
8
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
9
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
10
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
11
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
12
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
13
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
14
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
15
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
17
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
18
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
19
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
20
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

दोन दिवसांत सोने ९०० तर, चांदी तीन हजारांनी उतरली; सोने ७३ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर!

By विजय.सैतवाल | Updated: July 20, 2024 17:33 IST

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या काही दिवसांपासून ९३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात घसरण होत असून या दोन दिवसात ती तीन हजार रुपयांनी घसरली आहे. शुक्रवारी ९१ हजार रुपयांवर आल्यानंतर शनिवारी पुन्हा चांदीत एक हजार रुपयांची घसरण झाली व ती ९० हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. दुसरीकडे सोन्याच्याही भावात दोन दिवसात ९०० रुपयांची घसरण होऊन ते शनिवारी ७३ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.

गेल्या १० दिवसांपासून चांदी ९२ ते ९३ हजार रुपयांदरम्यान राहत आहे. गुरुवारपर्यंत ९३ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी (१९ जुलै) दोन हजार रुपयांची घसरण झाली व ती ९१ हजार रुपयांवर आली. त्यानंतर शनिवारी पुन्हा एक हजार रुपयांची घसरण होऊन चांदी ९० हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. १७ दिवसातील हे कमी भाव असून या पूर्वी ३ जुलै रोजी चांदी ९० हजारांवर होती.

दुसरीकडे गुरुवारी (१८ जुलै) ७४ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात शुक्रवारी (१९ जुलै) ७०० रुपयांची तर शनिवारी पुन्हा २०० रुपये अशी दोन दिवसात एकूण ९०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने ७३ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी