जामनेर : नाफेडच्या ग्रेडरअभावी ठप्प झालेली येथील तूर खरेदी बुधवारी दुपारी सुरू झाली, मात्र हमालांची कमतरता व मोजणीसाठी असलेला एकमेव काटा यामुळे खरेदी संथगतीने सुरू आहे. दरम्यान, तूर खरेदी केंद्रावर माहिती घेण्यासाठी आलेल्या नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांना संतप्त शेतकºयांनी घेराव घालून गाºहाणे मांडले.नाफेडचे ग्रेडर आले तरच खरेदी करू, अशी आडमुठी भूमिका शेतकरी संघाने घेतल्यामुळे खरेदी बंद पडल्याने शेतकºयांचे हाल सुरू आहेत. बुधवारी नाफेडचे ग्रेडर आनंद वाघ केंद्रावर आले. सद्य:स्थितीत बाजार समिती आवारात सुमारे चार हजार क्विंटल तूर असून, आठ दिवसांपासून खरेदीसाठी शेतकरी थांबून आहेत.तुरीची आवक जास्त व दिवसभरात मोजणी अत्यंत संथगतीने होत असल्याने वेळ लागत आहे. मोजणीसाठी शेतकरी संघाने काटे वाढवावेत व हमालांची संख्यादेखील वाढवावी, अशी मागणी उपस्थित शेतकºयांनी केली.बुधवारी सकाळीच केंद्रावर ग्रेडर आले. मात्र खरेदीच सुरू होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अशातच महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी जात असलेले नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांच्या गाडीला थांबवून शेतकºयांनी त्यांना घेराव घातला व त्यांच्यासमोर आपले गाºहाणे मांडले.बाजार समिती आवारात असलेल्या गोडाऊनपैकी फक्त एकच गोडाऊन शेतकरी संघाला तुरीचे पोते ठेवण्यासाठी देण्यात आले आहे. पोत्यांनी भरल्यानंतर खरेदी केलेली तूर कोठे ठेवावी, अशी समस्या असल्याने पुन्हा काही काळ खरेदी थांबविली जाते. यासाठी बाजार समितीने जास्तीचे गोडाऊन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.सहा ते आठ दिवसांपासून थांबल्याने ट्रॅक्टरचे भाडे वाढत असल्याने शेतकºयांनी उघड्यावर तुरीचे पोते ठेवले आहेत. आवारात फिरणाºया डुकरांचा शेतकºयांना त्रास होत असून, तुरीचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या.शासकीय तूर खरेदी केंद्रावर ग्रेडरअभावी ठप्प झालेली तूर खरेदी आजपासून नियमित सुरू झाली असून, नाफेडचे ग्रेडर नियमित येऊन खरेदी करतील. शेतकºयांच्या समस्या ऐकून घेतल्या. मोजणीसाठी जादा काटे व हमाल संघाने पुरवावेत यासाठी त्यांच्याशी संपर्क करीत आहोत. -परमेश्वर कासुडे, नायब तहसीलदार, जामनेर
संतप्त शेतकºयांचा तहसीलदारांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2017 12:14 AM