जामनेर, दि.जळगाव : पालिकेने बांधलेल्या घरकुलातील लाभार्र्थींचे वीज कनेक्शन अनधिकृत असले तरी दोन दिवसात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्याच्या अटीवर सोमवारी रात्री काही भागाचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र मंगळवारी फक्त ४३ लाभार्र्थींनी नवीन मीटर मागणीचे अर्ज सादर केल्याची माहिती मिळाली.स्थानिक नगरसेवक प्रत्येक लाभार्थीस भेटून त्यांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देत होते. एकलव्य नगर भागातील ४० व जवळच्या दुसऱ्या घरकुलातील फक्त तीन लाभार्र्थींनी नवीन कनेक्शनसाठी अर्ज सादर केले.अनधिकृतपणे घेतलेल्या विजेच्या जीर्ण वायरमधून झालेल्या वीजपुरवठ्याचा धक्का बसल्याने सोमवारी दोन गुरे दगावली होती. या घटनेनंतर वीज वितरण कंपनी व पालिका प्रशासन सतर्क झाले.दरम्यान, या घटनेबाबत काँग्रेसचे कार्यकर्ते अशपाक पटेल यांनी सांगितले की, घरकुलातील लाभार्थ्यांना नियमित व अधिकृत वीजपुरवठा करण्याबाबत शहर विभागातील कनिष्ठ अभियंत्याशी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पालिकेने घरकुलांचे वाटप करण्यापूर्वी त्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांची पूर्तता करणे गरजेचे होते. तसे न करता घाईघाईने लाभार्र्थींना घरकुलांचे वाटप केले. आजही येथे बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. घरकुलातील लाभार्र्थींना अधिकृत वीज कनेक्शन मिळण्यासाठी पालिकेने कार्यवाही करणे गरजेचे आहे.पालिकेने आयएचएसडीपी योजनेंतर्गत घोडेपीरनगर व एकलव्यनगर भागातील घरकुलातील लाभार्र्थींनी मागणी केल्यास त्यांना या जागेत त्यांच्या नावावर स्वखर्चाने वीजपुरवठा देण्यास पालिकेची हरकत नाही, मात्र प्रत्येक अर्जासोबत पालिकेने त्यांना दिलेल्या ताबापावतीची झेरॉक्सप्रत घेण्यात यावी, असे पत्र वीज वितरण कंपनीस दिल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली.जामनेर शहरातील घरकुलांमध्ये राहणाºया लाभार्र्थींनी अधिकृत विजेचे कनेक्शन मागणीचे अर्ज सादर करणे अपेक्षित होते, मात्र आज फक्त ४३ अर्जच आले. नागरिकांनी तातडीने वीज जोडणी करून घ्यावी.-सतीश राजपूत, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण कंपनी, जामनेरजामनेर पालिकेने बांधलेल्या घरकुलात कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. केवळ ठेकेदाराला वाचविण्यासाठी प्रशासनाने घाईगर्दीत गोरगरीब लाभार्र्थींना वाटप केले. याचा त्यावेळेस पालिकेच्या सभेत विरोध केला होता. घोडेपीरनगरजवळ बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले पाहिजे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ज्या ठिकाणी विजेच्या धक्क्याने गुरे दगावली, तो मुंबई-नागपूर राज्यमार्ग असून, या रस्त्याने दिवसभर वाहतुक सुरू असते. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाने घटना घडली. सुदैवाने अनर्थ टळला, प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. -जावेद ईक्बाल रशीद, माजी उपनगराध्यक्ष, जामनेर