जळगाव : सेवारत परिवारातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात पाच ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. या ॲम्बुलन्स गरजु रुग्णांना अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ॲम्ब्युलन्सच लोकार्पण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, आर्युवेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद निकुंभ, सेवारत परिवाराचे दिलीप गांधी, निलीमा सेठिया, डॉ. रितेश पाटील, ज्योत्स्ना रायसोनी, महेंद्र रायसोनी, कवी कासार, चंद्रशेखर नेवे, रमेशकुमार मुणोत, आदित्य पगारीया, अपर्णा भट या उपस्थित होत्या . या ॲम्बुलन्स पुखराज पगारिया, कंवरलाल संघवी या सह इतर दात्यांच्या मदतीतुन सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्या स्टेडिअमजवळ लावण्यात येणार असून त्याचे नियोजन हे कवी कासार करणार आहेत. तसेच आणखी पाच वाहनांचे लवकरच लोकार्पण करणार असल्याचे डॉ. रितेश पाटील यांनी सांगितले.