जळगाव- बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे अॅडव्हान्स पॉवर कॉन्व्हर्टस फॉर इंडस्ट्रियल अॅण्ड रिन्यूएबल अॅप्लिकेशन या विषयावर आयोजित पाच दिवसीय कार्यशाळेचे सोमवारी थाटात उद्घाटन झाले.यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन छबी इलेकट्रीकल्सचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन चौधरी, ट्रान्स इलेकट्रीकल्स चे संचालक अनिल बोरोले व डी. एस. ढाके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुरत येथील प्राध्यापक डॉ. एम. ए. मुल्ला, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, डॉ एस. पी शेखावत यांच्यासह कार्यशाळेचे समन्वयक डॉ. पी. जे. शाह व डॉ. पी. व्ही. ठाकरे आदींची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर डॉ़ पी़जे़शाहर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले़ त्यात ते म्हणाजे की, कार्यशाळेचा मुख्य उद्देश हा आहे की सहभागी प्राध्यापक आणि तंत्रज्ञ हे विविध औद्योगिक आणि नूतनीकरणीय अनुप्रयोगांमध्ये प्रगत ऊर्जा इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचा वापर करण्याबद्दल अद्ययावत करणे हा आहे, असे सांगितले़ त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ क़े़. एस.वाणी यांनी आपल्या स्वागत भाषणामध्ये सांगितले की, अश्या कार्यशाळा आयोजित करून जगातील विविध तंत्रज्ञानाची माहिती प्राध्यापकांनी मिळवून ती आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांची भविष्य अधिकाअधिक उज्ज्वल करावे.संतुलन राखण्यासाठी टिकाऊ उर्जा महत्वाचीजागतिक पातळीवर नूतनीकरणक्षम उर्जा स्त्रोतांकडे होणारे बदल म्हणजे वातावरणातील बदल कमी होण्यास महत्वपूर्ण योगदान ठरते़ तसेच मानवी जीवनासाठी आणि परिस्थितिक संतुलन कायम राखण्यासाठी टिकाऊ उर्जेची व्यवस्था महत्त्वपूर्ण आहे. याबद्दल आम्हाला जाणीव असली पाहिजे, असे मोहन चौधरी यांनी व्यक्त केले़ त्यानंतर डॉ़एम़ए़मुल्ला यांनी मार्गदर्शन केले़ कार्यशाळेत मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, खामगाव, चंद्रपूर, धुळे, मालेगाव तसेच जळगाव विभागातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते़सूत्रसंचालन डी़एस़पाटील यांनी केले तर आभार डॉ़पी़व्ही़ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्ही.एस.पवार, एम.एम.अन्सारी, एस.एम.शेंबेकर, एऩएस़महाजन, ए.एस.बोरोले व बी.बी.पात्रा आदींनी परिश्रम घेतले़