मतदारांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा
जळगाव : जिल्ह्यात अकरावा राष्ट्रीय मतदार दिवस २५ जानेवारी रोजी जिल्हा मुख्यालय, तालुका व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व मतदारांना सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक बनविण्यासाठी कटिबध्द हे घोषवाक्य भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. यानिमित्त जिल्ह्यातील मतदारांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून २३ ते २५ जानेवारी करण्यात आले आहे.
छावा मराठा युवा महासंघातर्फे कृषी आंदोलन
जळगाव : संयुक्त किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत विविध संघटनातर्फे कृषी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन सुरु आहे. यात शुक्रवारी छावा मराठा युवा महासंघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी अमोल कोल्हे, मुकुंद सपकाळे, फारुख शेख, हरिश्चंद्र सोनवणे, प्रीतीलाल पवार यांनी मार्गदर्शन केले.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत धरणगाव व जळगाव तालुक्यात विविध कार्यक्रम
जळगाव : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत २३ जानेवारी सकाळी १० वाजता धरणगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होणार आहे. या सोबतच दुपारी ४ वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावातील नियोजित कार्यक्रमास भेट देणार आहेत.