भडगाव, जि.जळगाव : येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले.१ ते १५ दरम्यान विविध कार्यक्रम व स्पर्धांच्या माध्यमातून हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.सुरूवातीला क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ज्यात्स्ना ईश्वर दोडे, दीपक ठाकरे, शुभांगी रवींद्र पाटील, आरती भास्कर राठोड या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभागप्रमुख डॉ.सी.एस.पाटील होत्या. यावेळी बोलताना डॉ. सी.एस.पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यिक कर्तृत्वावर प्रकाश टाकला. सावित्रीबाईंच्या कवितेतील आशय बघता त्यांनाच आधुनिक मराठी कवितेचे जनकत्व दिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सावित्रीबाई समाजक्रांतीच्या अग्रदूत तसेच आधुनिक मराठी काव्यक्रांतीच्या अग्रदूत होत्या. त्यामुळे त्यांचे कार्य हे कधीही न विसरण्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी मराठी भाषेचे मातृभाषा म्हणून महत्त्व सांगितले. प्रत्येक मराठी माणसाने आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगायला हवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. पी.डी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले यांनी, तर आभार डॉ.अतुल देशमुख यांनी केले.या वेळी प्रा.एल.जी.कांबळे, प्रा.एस.ए.कोळी, डॉ.सचिन हडोळतीकर, प्रा.जे.जे.देवरे, प्रा.एस.आर.कोळी, प्रा.प्रदीप वाघ, प्रा.चेतन पाटील व प्रा.मंजुषा जाधव तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
भडगाव महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 3:55 PM
भडगाव येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. १ ते १५ दरम्यान विविध कार्यक्रम व स्पर्धांच्या माध्यमातून हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे१ ते १५ दरम्यान विविध कार्यक्रम व स्पर्धांच्या माध्यमातून पंधरवडा साजरा करणारसावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आली काव्यवाचन स्पर्धाप्रत्येक मराठी माणसाने आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगायला हवा