आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १७ - शहरातील पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन २३ मे रोजी सकाळी ११ वाजता खासदार ए.टी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यास पासपोर्ट कार्यालय तसेच विदेश मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.हे पासपोर्ट कार्यालय तहसील कार्यालयासमोरील पोस्ट कॉलनीतील पोस्ट कार्यालयात सुरू करण्यात येत आहे. त्याच्या उद्घाटनाचा घोळ कधीपासून सुरू असून या उद्घाटन कार्यक्रमासाठी निवृत्त जनरल व्ही.के.सिंग तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना बोलविण्याचे प्रयत्न सुरू होते. एप्रिल २०१८ च्या दुसऱ्या आठवड्यातच हे उद्घाटन होणार होते.मात्र वेळ मिळत नसल्याने हे उद्घाटन रखडले होते. त्यामुळे अखेर खासदार पाटील यांच्या हस्तेच या पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन उरकण्यात येणार आहे.नागरिकांना त्यांच्या जिल्हयातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या तत्वानुसार पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात ७ तर देशभरात १७३ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली असून दुस-या टप्प्या अखेर येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात १३ केंद्रांसह देशभरात २५१ पासपोर्ट सेवा केंद्रांचे उदिष्टय पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात जळगावचाही समावेश आहे. त्यानुसार जळगाव पोस्ट आॅफीसनेही हे कार्यालय सुरू करण्याची तयारी केली आहे. तहसील कार्यालयाजवळील पोस्ट कॉलनीत असलेल्या पोस्ट कार्यालयात हे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
जळगाव येथे पासपोर्ट कार्यालयाचे २३ मे रोजी होणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:07 PM
विदेश मंत्रालय अधिकारी येणार
ठळक मुद्देखासदार ए.टी.पाटील यांच्याहस्ते होणार उद्घाटननागरिकांना जिल्हयातच पासपोर्ट