जळगाव - नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात ज्युनिअर कॉलेज विभागातर्फे वाड्मय मंडळाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. उपप्राचार्या एस.एस.नेमाडे यांच्याहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. सूत्रसंचालन दीपजा गायकवाड व मानसी महाजन यांनी केले. यावेळी शिक्षक उपस्थित हाेते.
०००००००००००००००००००००००००
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - नंदिनीबाई विद्यालयात विवेकानंद जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अकरावीतून दीपजा गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय हरिता विसावे तर तृतीय नेहा पाटील ठरली. इयत्ता बारावीतून मोनी खर्चाणे प्रथम, द्वितीय शिवानी जाधव तसेच तृतीय दिव्या चौधरी ठरली आहे. यावेळी प्राचार्या सी.एस.पाटील उपस्थित होत्या.
०००००००००००००००००००००००
मानसेवा विद्यालयात कथा वाचन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मानवसेवा विद्यालयात बुधवारी कथा वाचन उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग नोंदवून दररोज एका कथेचे वाचन केले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका माया अंबटकर, मुक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
००००००००००००००००००००
इकरा शाहीन विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -इकरा शाहीन उर्दू विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंरववाडा साजरा करण्यात आला. या पंधरवाड्यात शुध्द लेखन स्पर्धा, लघुपट दाखविणे, काव्य वाचन, पुस्तक प्रदर्शनी, कथाकथ आदी स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक शेख गुलाब इस्हाक, शेख रोशन मुश्ताक, अनिसा शुजाउद्दीन, शेख जावेद यांनी दिली.
००००००००००००००००००००
शुध्द लेखन स्पर्धेत १०२ विद्यार्थ्यांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मराठी भाषा संवर्धन पंधरवाडातंर्गत इकरा पब्लिक स्कूलमध्ये शुध्द लेखन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन इरफान शेख यांच्याहस्ते झाले. ईश्वन सोनगिरे व पठाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन वाजीद पठाण यांनी केले. आभार शकील शेख यांनी मानले.