जळगाव : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविली जात आहे़ नियुक्त शिक्षकांना प्रत्यक्ष घरोघरी फिरून माहिती गोळा करावयाची आहे. परिणामी, शिक्षकांना कोरोना होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण संघाच्यावतीने जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सेके्रटरी शालिग्राम भिरूड यांची स्वाक्षरी आहे.शिक्षकांना लस द्यावीअमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. शिक्षकही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळत आहे. अश्या परिस्थिती शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे योग्य नाही. त्यामुळे ही मोहीम थांबवावी व त्याआधी शिक्षकांना कोरोना लस द्यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी केली आहे.