आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २० - शहरात अचानक झालेल्या वादळ व अवकाळी पावसाने सोमवारी रात्री दोन जणांचा बळी घेतला. तर एक जण जखमी झाला आहे. वादळ व ढगाळ वातावरणामुळे लवकर काम आटोपून पत्नी व मुलाला घेऊन घरी जात असताना दुचाकी घसरुन छोटेलाल हजारे माळी (वय ४० रा.त्र्यंबक नगर, जळगाव) हा फुल विक्रेते जागीच ठार झाल्याची घटना महाबळ कॉलनीत घडली. तर गच्चीवरील टोपीची भींत कोसळून शेजारच्या पार्टीशनच्या घरात राहणारी मोनिका बंटी बोरसे (वय ३) ही बालिका ठार झाल्याची घटना वाल्मिक नगरात घडली. तिसऱ्या घटनेत डी. मार्टजवळ झाडाची फांदी अंगावर पडल्याने शुभम वाघ हा तरुण जखमी झाला. अचानक झालेल्या या वादळ व पावसामुळे शहरात प्रचंड नुकसान झाले.शहर अंधारातवादळ वारा व पावसामुळे शहरातील वीज पुरवठा रात्री ८ वाजता खंडित झाला. काही भागात रात्री ११.३० वाजता पुरवठा सुरळीत झाला मात्र अनेक भागात अंधार कायम होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
जळगावात अवकाळी पावसाने घेतला दोघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:01 PM
फुल विक्रेता व चिमुरडी ठार
ठळक मुद्देशोककळा दुचाकी घसरुन जागीच ठार