जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजयी होत भाजपा जिल्ह्यातील मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजपाच्या मताधिक्यात तब्बल 1 लाख 87 हजार 612 मतांची तर शिवसेनेच्या मताधिक्यात 42 हजार 864 मताची वाढ झाली आहे. काँग्रेसची 72 हजार 660 मते या निवडणुकीत कमी झाली आहे.जिल्हा परिषदेच्या 67 गटांसाठी व 134 गणांचा निकाल 23 फेब्रुवारी जाहीर झाला. यात सर्वाधिक 33 जागा घेत भाजपा जिल्ह्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे.भाजपाचे 1 लाख 87 हजार मते वाढलीजिल्हा परिषद व पंचायत समितीची मागील निवडणूक ही सन 2012 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत भाजपाला 3 लाख 52 हजार 943 मते मिळाली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या जि.प. निवडणुकीत 1 लाख 87 हजार 612 मतांनी वाढ होऊन भाजपाचे मताधिक्य पाच लाख 40 हजार 555 इतके झाले आहे. सर्वाधिक 64 हजार 689 मतदान हे चाळीसगाव तालुक्यात तर कमी मतदान बोदवड तालुक्यात 14 हजार 673 येथे झाले आहे.सेनेच्या मतांमध्ये वाढशिवसेनेच्या गेल्या वेळी 14 जि.प.सदस्य विजयी झाले होते. या निवडणुकीत देखील 14 जागांवर शिवसेनेचे सदस्य विजयी झाले आहेत. सन 2012 मध्ये शिवसेनेला दोन लाख 45 हजार 175 मते मिळाली होती. यावेळी बोदवड,जामनेर व अमळनेर तालुके वगळता त्यात 42 हजार 864 मतांची वाढ होऊन ते दोन लाख 88 हजार 39 र्पयत पोहचले आहे. काँग्रेसचे 72 हजार मते घटलीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या या निवडणुकीत तब्बल 6 जागा कमी झाल्या आहेत. काँग्रेसचे या निवडणुकीत तब्बल 72 हजार 660 मते कमी झाली आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 1 लाख 92 हजार 269 मते मिळाली होती. या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला केवळ एक लाख 19 हजार 609 मते मिळाली आहेत.राष्ट्रवादीचे गेल्या वेळी 20 सदस्य विजयी झाले होते. यावेळी केवळ 16 सदस्य विजयी झालेले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 64 हजार 225 मते घटली आहेत. यावेळी राष्ट्रवादीला तीन लाख 17 हजार 15 मते मिळाली आहेत.
भाजपा-सेनेच्या मताधिक्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2017 12:28 AM