जळगाव : दुधाच्या खरेदी दरात पावणे पाच ते पाच रुपये प्रती लिटरने वाढ झाल्याने जिल्हा दूध संघातर्फे दुधाच्या विक्री दरातही प्रती लिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ही वाढ दोन रुपये प्रती लिटर असली तरी दूध विक्री केंद्र चालकांकडून प्रती लिटर दोन रुपये जादा घेतले जात असल्याने ग्राहकांना थेट चार रुपयांचा भूर्दंड वाढला आहे.जळगाव जिल्हा दूध संघाने केलेली दूध दरवाढ २६ डिसेंबरपासून लागू झाली आहे. त्यात सर्वच प्रकारच्या दुधाच्या विक्री दरात प्रती लिटर २ रूपये वाढ झाली आहे.जिल्हा दूध संघाच्यावतीने या पूर्वीच दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र दुधाचे विक्री दर पूर्वीचेच कायम होते. मात्र हळूहळू खरेदी दर पावणे पाच ते पाच रुपये प्रती लिटरने वाढल्याने विक्री दराचा निर्णय दूध संघाने घेतला. त्यानुसार प्रती लिटर दोन रुपये दराने दुधाच्या विक्री दरात वाढ करण्यात आली.या सुधारीत दरानुसार आता फुल क्रिम मिल्क (गोल्ड दूध) ५६ रुपये प्रती लिटर, प्रमाणित दूध ४४ रुपये प्रती लिटर, स्मार्ट (गायीचे दूध) ४२ रुपये प्रती लिटर, टोण्ड (ताजा) दूध ४७ रूपये, गोल्ड दूध ५८ रुपये प्रती लिटर, स्मार्ट (गाय) ४१ रूपये प्रतिलिटर या प्रमाणे दर झाले आहे.दूध विक्री केंद्र चालकांकडून लूटएकीकडे प्रती लिटर दोन रुपये प्रती लिटरने दुधाचे भाव वाढले असताना दूध विक्री केंद्र चालकांकडून अधिकचे पैसे घेतले जात असल्याने वाढीव भावाचा भूर्दंड अधिकच वाढत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रीर आहेत. अर्धा लिटरच्या एका पिशवी मागे एक रुपया ग्राहकांकडून शिल्लक घेतला जात असून दुधाचे वाढव दर असल्याने त्या भावातच ते विक्री होणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे, अशा तक्रारी ग्राहक करीत आहेत.एकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांसाठी सरकी ढेपची ६५ किलोची गोणी २५०० रूपयांना घ्यावी लागत आहे. तर कोरडा चाराही उपलब्ध नाही. अति पावसामुळे चाºयावर परिणाम होऊन तो मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे पशुपालकांना वाढीव भाव देणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.राज्यभरात या हंगामात दुधाच्या दरात वाढ केली जाते, त्यानुसार दरवाढीचा निर्णय घेतला.- मंदाकिनी खडसे, अध्यक्षा, जिल्हा दूध संघ
दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:39 AM