जळगाव : पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीत कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय ११) या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत जन्मदात्या आई नाजीया परवीन जावेद अख्तर व वडील जावेद अख्तर शेख जमालोद्दीन या दोघांविरोधात बुधवार, दि. २८ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती. आज गुरुवार, दि. २९ एप्रिल रोजी दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना २ मेपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मदत संपल्याने आज दोघांना हजर केले असता, दोघांना पुन्हा दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित जावेद अख्तर यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या, तर संशयित नाजीया हीस शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
'त्या' आई, वडिलांच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:11 AM