जळगाव : नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे, मात्र शेतकरी अजूनही पारंपरिक पध्दतींमध्ये अडकला आह़े केवळ चरितार्थ म्हणून केळीची शेती केली जात आह़े बदल स्विकारणे ही काळाची गरज आह़े शेतक:याने प्रत्येक तंत्रज्ञानाचा टप्पा अवगत करून घेतला पाहिज़े जगात कुठे नाही एवढे उत्तम आणि पोषक हवामान जळगाव जिल्ह्यात आहे. मात्र त्याचा शेतकरी अद्यापही लाभ घेत नाही, अशी खंत शास्त्रज्ञांनी अॅगिसर्च कंपनीतर्फे आयोजित केळी उत्पादन व तंत्रज्ञान परिषदेत व्यक्त केली. मृदा परीक्षण, पाणी व्यवस्थापन, हाताळणी या किरकोळ गोष्टींही उत्पादनासाठी परिणामकारक ठरू शकतात़ समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा त्यावर मार्ग शोधणे गरजेचे आह़े शेतक:याला स्पर्धेत टिकायचे असेल तर त्याने केळीची गुणवत्ता तसेच उत्पादकता यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आह़े ती वाढविणे गरजेचे आहे, असा सूर ही यावेळी व्यक्त झाला. भुसावळ रोडवरील एका हॉटेलमध्ये ही परिषद झाली. जैन उद्योग समुहाचे महाराष्ट्र विपनण प्रमुख अभय जैन यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आल़े यावेळी पुणे येथील महाराष्ट्र कृषि संशोधन व शिक्षण परिषदचे संचालक डॉ.हरिहर कौसडीकर, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी सल्लागार डॉ. के.बी. पाटील, गुजरात येथील आनंद कृषि विद्यापीठाचे सुत्रकृमी शास्त्रज्ञ डॉ. अशोक पटेल, जळगाव येथील पीक विषाणू शास्त्रज्ञ डॉ. अखिलेश मिश्रा, नवसारी कृषि विद्यापीठाचे निवृत्त डीन डॉ. आर. जी. पाटील, जैन इरिगेशनमधील शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील, सह्याद्री फार्मचे सचिन वाळूंज , नाशिक येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे आदी उपस्थित होत़े केळी परिषदेत खर्चात गुणवत्तापूर्ण केळीचे उत्पादन , केळीच्या वाढीसाठी अन्नद्रव्य व घड व्यवस्थापन, विविध रोगापासून केळीचा बचाव , उपाययोजना, माती, पाणी, पान देठ परिक्षण-अन्नद्रव कमतरता, व विषारता या बद्दल मार्गदर्शन, केळी निर्यात संभावना व त्यातील संधी, केळीप्रक्रिया उद्योग , खोडापासून फायबर निर्मिती, किडी-रोग यांची माहिती व नियंत्रणाचे उपाय यावर तंज्ञ मार्गदर्शनकांनी विचार मंथन केल़ेकमी खर्चात जास्त उत्पादनाचे गणितपरिषदेत डॉ़ अनिल पाटील यांनी ऊती संवर्धनाच्या माध्यमातून केळीची उत्पादन व गुणवत्ता वाढ यावर मार्गदर्शन केल़े ते म्हणाले, कमी खर्चात जास्तीचे उत्पन्न कसे घेता येईल, याचे गणित शेतक:यांनी आखले पाहिजे, लागवड करताना व लागवडीनंतर खर्च कसा कमी होईल, यासाठीच्या किरकोळ महत्वाच्या गोष्टी आहेत़ बियाणे तपासली गेली पाहिजे, कारण अनेक पिकांवरील आजार हे बियाणांसोबत शेतात पसरत असतात़ या रोगनियंत्रणावर खर्च होतो, हा खर्च वाचविता आला पाहिज़े तसेच ज्याप्रमाणे मनुष्याला वयानुसार औषधीचे प्रमाण ठरलले असत़े त्यानुसार केळीच्या झाडानाही वयानुसार प्रमाणात औषधी दिली पाहिज़े लागवडीचा खर्च वाचवून जास्तीचे उत्पन्न कसे घेता, येईल याकडे शेतक:याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितल़ेशेतक:यांनी मातीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावेडॉ़ हरिहर कौसडीकर यांनी केळीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि अजैविक तण व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केल़े अन्नद्रव्य व्यवस्थापन हा केळी उत्पादनवाढीसाठी महत्वाचा घटक आह़े त्याचाही उत्पन्नावर परिणाम होतो़ अन्नद्रव्याचे कुटुंबाप्रमाणे नाते आह़े पिकांच्या प्रकारानुसार त्याचा वापर करण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत़ अन्नद्रव्यांचा एकमेकांशी संबंध असतो़ त्यानुसर त्याचे प्रमाण असले पाहिज़े दिवसेंदिवस एकच पिक पध्दत, अतिपाण्याचा वापर, रासायनिक खते यामुळे मातीचे आरोग्य बिघडले आह़े त्याकडे शेतक:याने लक्ष देणे गरजेचे आह़े
केळीची उत्पादकता व गुणवत्ता वाढवा
By admin | Published: January 09, 2017 12:18 AM