शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

डाळीतील तेजी वाढवतेय चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:23 PM

गेल्या वर्षापासून कमी असलेले डाळीचे भाव यंदा पुन्हा एकदा वाढू लागले

ठळक मुद्देगव्हाच्या भावातही वाढतांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव स्थिर

विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या वर्षापासून कमी असलेले डाळीचे भाव यंदा पुन्हा एकदा वाढू लागले असून यामुळे दोन वर्षापूर्वीच्या चिंतेची पुन्हा ग्राहकांना आठवण होऊ लागली आहे.दोन वर्षांपूर्वी तूर डाळ २०० रुपये प्रती किलोवर पोहचली होती. त्यामुळे ग्राहक चांगलेच हवालदिली झाले होते. मात्र गेल्या वर्षी डाळींचे भाव कधी नव्हे एवढ्या प्रमाणात कमी झाले की, शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. मात्र यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. यंदा मात्र पुन्हा डाळींचे भाव वाढतच असून तीन आठवड्यांपासून ही चिंता भेडसावत आहे. त्यात यंदा गहू, ज्वारी, बाजरीचेही भाव वाढत असल्याने चिंतेत अधिक भर पडत आहे.जळगावच्याबाजारपेठेमध्ये डाळींसह गहू, ज्वारी, बाजरी, दादर यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. डाळींची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सलग तिसऱ्या आठवड्यात डाळींच्या भावात वाढ झाली आहे. तांदूळ स्थिर असल्याने तेवढा दिलासा असल्याचे मानले जात आहे. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून त्यांचे भाव तीन आठवड्यापासून वाढत आहे. यामध्ये ऐन उडीद, मुगाची आवक असणाºया काळातच उडीद, मूग तसेच डाळींमध्ये व ज्वारी, बाजरींच्या भावात वाढ सुरू आहे.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत आहे. या आठवड्यात तर गव्हाचेही भाव वाढले.गेल्या आठवड्यात ७४०० ते ७८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही वाढ होऊन ती ६४०० ते ६८०० रुपयांवरून ६५०० ते ६९०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्यात ६२०० रुपये प्रती क्विंटलवर असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६५०० ते ६६०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ६००० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवरून ६६०० ते ७००० रुपये प्रती क्विंटल झाले आहे.चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. तसेच चांगल्या दर्जाच्या उडिदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.गव्हाच्या भावातही वाढअनेक ग्राहक आपल्या घरात सहा महिन्यांसाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे उन्हाळ््यानंतर आता पुन्हा दिवाळीच्या काळात गव्हाला मागणी वाढल्याने या आठवड्यात १०० रुपये प्रती क्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात गव्हाचे भाव स्थिर आहेत. मात्र या आठवड्यात त्यात वाढ होऊन १४७ गहू २५५० ते २६५० रुपयांवरून २६५० ते २७५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल, चंदोसीचे भाव ३८५० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.ज्वारीचे भाव २००० ते २३०० रुपये प्रती क्विंटल झाले असून बाजरी २३०० रुपये प्रती क्विंटल, दादर ३००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.तांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव स्थिर आहेत.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव