शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

प्लॅस्टिकबंदीपेक्षा जनजागृती करून पुनर्वापर वाढवा, जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:02 PM

बंदी अन्यायकारक असल्याचा सूर

ठळक मुद्दे३० रोजी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनप्लॅस्टिकविषयी चुकीची माहिती

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करणे हा उद्योगासह व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक निर्णय असून याचा सरकारने सामंजस्याने विचार करावा, प्लॅस्टिक हे पूर्णपणे पुननिर्मित होणारे असून सरकारने त्यावर बंदीपेक्षा त्याचा पुनर्वापर वाढवावा आणि या विषयी जनजागृती करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेदरम्यान जळगाव जिल्हा प्लॅस्टिक असोसिएशनच्यावतीने किरण राणे यांनी केली. दरम्यान, ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात येत असल्याने त्यांना या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने याचा जळगावात मोठा परिणाम होणार आहे. या संदर्भात मंगळवारी दुपारी रोटरी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी किरण राणे यांच्यासह नितीन रेदासनी, अमित भुतडा, सुभाष तोतला, रमेश माधवानी उपस्थित होते.प्लॅस्टिकविषयी चुकीची माहितीप्लॅस्टिक नष्ट होत नाही, यामुळे पर्यावरणास धोका निर्णाण झाल्याचा चुकीचा प्रचार केला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. उलट प्लॅस्टिक पूर्णपणे पुर्ननिर्मित होते, असे सांगून याचा रस्ते करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापर होऊन लागल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लॅस्टिकचा ‘गोल्डन मटेरिअल’ म्हणून गौरव केला आहे, तरीदेखील राज्य सरकार यावर बंदी आणत असल्याच्या धोरणावर या वेळी टीका करण्यात आली.उद्योजक, व्यापारी देशोधडीला लागतीलप्लॅस्टिक उद्योग, व्यापार सुरू करताना त्यांनी सरकारचीच परवानगी घेतली व अब्जावधी रुपये गुंतवून उद्योग उभे केले. सरकार एका दिवसात निर्णय घेऊन ते बंद करण्याचे म्हणत असल्याने उद्योजक, व्यापारी देशोधडीला लागतील, अशी भीती या वेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सरकारने याचा सामंजस्याने विचार करावा, अशी मागणी राणे यांनी केली....तर एकही झाड शिल्लक राहणार नाहीदैनंदिन जीवनातील वापराच्या चहा वस्तूंसाठी ९० टक्के प्लॅस्टिकचा वापर होतो. प्लॅस्टिकला पेपर बॅगचा पर्याय शिल्लक राहतो, मात्र दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर बॅगचा वापर वाढला तर भारतात एकही झाड शिल्लक राहणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले. या सोबतच पेपर बॅग तयार करण्यासाठी पाण्याचाही मोठा वापर होईल, त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही, असाही मुद्दा या वेळी मांडण्यात आला.अपले अपयश लपविण्यासाठी तुघलकी निर्णयप्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र राज्यात सर्वत्र आढळणारा प्लॅस्टिक कचरा यास शासनाचे घनकचरा व्यवस्थापनातील अपयश कारण असून आपले अपयश लपविण्यासाठी सरकारने असा तुघलकी निर्णय घेतलाआहे.गुजरातमध्ये जावून उद्योग उभारावा का?जळगाव शहरात उद्योग उभारणीस पूरक वातावरण नाही, त्यात जे उद्योक आहे ते आता बंद होऊन बेरोजगारीही वाढेल व उद्योजक, व्यापाºयांना करोडोंचा फटका सहन करावा लागेल. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये जाऊन उद्योग उभारावा का? असा संतप्त सवाल सुभाष तोतला यांनी उपस्थित केला.जळगाव हे प्लॅस्टिक पुनर्वापराचे उत्तम उदाहरणप्लॅस्टिक हे वाईट नाही ते वाईट बनविले गेले. त्याचा पुनर्वापर शक्य आहे. जळगावातच प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून चटई तयार करणारे २५० उद्योग असल्याचे किरण राणे यांनी सांगून पुनर्वापराचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनप्लॅस्टिक बंदीचा निर्णय अन्यायकारण असून याबाबत सहानुभूतीपूर्वीक विचार करावा, अशा मागणीचे निवेदन ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील हे जळगावात येत असल्याने त्यांना देण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावPlastic banप्लॅस्टिक बंदी