सैयद लियाकत ।जामनेर, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात गेल्ल्या पाच-सहा दिवसांपासून एका चर्चेला उत आहे ‘याची मुलगी पळून गेली...’, ‘त्याचा मुलगा पळून गेला...’ मोबाइल, चित्रपट, टीव्ही मालिकांचे अनुकरण करीत घरच्यांचा विरोध असूनही ‘प्रेमीयुगुलांचे, पलायन करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात जवळपास २२ मुला-मुलींनी पलायन केले आहे. गेल्या तीन वर्षात १०५ जण हरविल्याची (मिसिंग) नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. यात तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात ७० तरुण-तरुणीनी पलायन केले आहे. यातील काहींंची पोलीस ठाण्यात नोंद आहे, तर काहींंनी प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, बदनामी होईल या भीतीपोटी पोलीस गाठलेच नाही. मात्र घडत असलेल्या प्रकारांबद्दल पालकवर्गात चिंतेचे वातावरण असून, दुसरीकडे हा विषय चर्चेचा विषय बनला आहे.प्रेमीयुगुलाने शहरातून, गावातून पलायन केले तर चार दिवस, १५ दिवस, महिनाभरात ते रजिस्टर लग्न करूनच पोलीस ठाण्यात दाखल होतात. काही मुलीदेखील प्रेमात आंधळ्या होत, आई-वडिलांचा, भविष्याचा कुठलाही विचार न करता लग्नाला समंती देतात. या वाढत्या प्रकरणामुळे अनेक पालक चिंतित झाले आहेत. या प्रकाराला आळा बसावा म्हणून महाविद्यालयात जनजागृती, शिबिरे, व्याख्याने राबविण्याची गरज आहे.पालकानी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांशी संवाद साधला पाहिजे. आईने मुलीची दररोज चौकशी करावी. त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवणे गरजेचे आहे.-राजेश काळे,प्रभारी पोलीस अधिकारी, जामनेर
जामनेर तालुक्यात प्रेमीयुगुल पलायनाच्या प्रकारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 5:51 PM
चार महिन्यात २२, तर तीन वर्षात ७० प्रेमीयुगल गायब, चर्चेचा विषय
ठळक मुद्देतालुक्यात गेल्या चार महिन्यात मुलींना पळवून नेणे व प्रेमीयुगुल म्हणून पलायन करणे अशी जवळपास २२ प्रकरणे झाली असून, काहींची पोलीस ठाण्यात नोंद आहे. परंतु नोद नसलेलीही अनेक प्रकरणे आहेत.या प्रकाराने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.