जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून वाढीव १२० ‘आयसीयू बेड’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामधील ६० बेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तर ६० बेड डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बसविण्यात येणार असून या सोबतच ६० ते ७० व्हेंटिलेटरही मागविण्यात येणार आहे. प्रधान सचिव राजेश जलोटा यांनी सोमवारी जिल्ह्याचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला त्या वेळी या विषयावर चर्चा करण्यात आली.जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजनांसाठी पावले उचलले जात आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या काय स्थिती आहे व आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजे या विषयीचा प्रधान सचिव राजेश जलोटा यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व अन्य अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या मध्ये त्यांनी सध्या किती तपासण्या होत आहे, काय अडचणी येत आहेत, भविष्यातील शक्यता काय असू शकते याचा आढावा घेतला. त्यानंतर आगामी काळासाठी दक्षता म्हणून जिल्ह्यासाठी वाढीव १२० आयसीयू बेडची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० आयसीयू बेड असण्यासह ३० वाढविण्यात येऊन ६० बेड करण्यात आले आहे. यात आणखी भर म्हणून मिळणाºया १२० बेडपैकी ६० बेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी राहणार आहे. तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १०० आयसीयू बेड असून मिळणाºया बेडपैकी ६० बेड तेथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या सोबतच ६० ते ७० व्हेंटिलेटरही बसविण्यात येणार असून त्यासाठी लागणारे मॉनिटरचेही नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.आणखी वैद्यकीय अधिकारी येणारगेल्या आठवड्यात नवीन १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची तर ४५ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच आता आणखी वैद्यकीय अधिकाºयांची आवश्यता असल्याचा मुद्दा जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी प्रधान सचिव जलोटा यांच्याकडे मांडला. कोरोनाच्या उपचारासाठी आयसीयू व इतर कक्षातील कामांसंदर्भात परिचारिका व इतर स्टॉफला आठ ते दहा दिवसात प्रशिक्षितही केले जाणार आहे.अखेर डिजिटल एक्सरे दाखलकोविड रुग्णालय घोषित झाल्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर दोन डिजिटल एक्सरे मशिन कोविड रुग्णालयाला प्राप्त झाले असून ते कार्यान्वयीत करण्याचे काम सोमवारी सायंकाळी सुरू होते़ यातील वॉर्ड एकमध्ये एक व अन्य ठिकाणी एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे़ या माध्यमातून लवकर निदान होणार आहे़
जिल्ह्यासाठी वाढीव १२० आयसीयू बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:25 PM