जळगाव : जिल्हाभरात तीनच ६३ दिवसात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे़ त्यामुळे बाधितांची संख्या १२४ वर गेली आहे़ यातील १२२ रुग्ण हे गेल्या १९ दिवसात आढळून आलेले आहेत़ या वाढत्या रुग्ण संख्येसोबतच प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे चाचण्यांची संख्या वाढणे, बाधितांच्या संपर्कातील रुग्ण आढळणे, अशी काही कारणे प्रशासकीय पातळीवरून दिले जात आहेत़कोरोनाचा हा तिसरा टप्पा नाही, असेही सांगितले जात आहे़ जिल्हावासीयांची मात्र यामुळे चिंता वाढली आहे़ मात्र, सोर्स सापडल्यामुळे येत्या काही दिवसात परिस्थितीवर नियंत्रण मिळविता येणार आहे़ असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे़सोर्स सापडल्याने नियंत्रण शक्यअमळनेर, पाचोरा, अडावद आदी ग्रामीण भागातील कोरोना बाधित मुख्य सोर्स शोधण्यात आले. बाधितांची वाढती संख्या ही या सोर्सच्या आसपास फिरत आहे़ हे लोक आधीच क्वॉरंटाईन असल्याने येत्या काही दिवसात परिस्थिती नियंत्रणात येईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे़भुसावळात हिस्ट्रीचा गोंधळभुसावळात सर्वात आधी समता नगरातील महिला बाधीत आढळून आली़ ही महिला एका नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी गेली असता या ठिकाणी खंडवा येथून काही नातेवाईक आलेले होते़ त्यातून या महिलेला बाधा झाल्याचे सांगण्यात येते़ सिंधी कॉलनीतील पहिला रुग्ण हा विक्रेता होता़ तो शहरभर फिरस्तीचे काम होते, त्यातून त्याला बाध झाल्याची शक्यता आहे़ त्याच्या संपर्कातील अन्य लोक बाधित आहेत़ मात्र, अन्य नवीन परिसरात बाधितांची हिस्ट्रीबाबत माहिती समोर आलेली नाही़अमळनेरच्या मागे पुण्याची हिस्ट्रीएक तरुण पुणे येथून परतला त्याच्या संपर्कात आल्यानंतर आई-वडिलांना कोरोनाची बाधा झाली़ त्यानंतर प्रशासनाने मृतदेह अहवाल येण्याआधी नातेवाईकांच्या ताब्यात दिला व नातेवाईकांनी मृत्यूचे शासनाने वेगळे कारण दिल्याचा दावा करीत सर्व धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार केले़ यातून अनेकांना लागण झाली़ त्यानंतर अमळनेरात कोरोनाचा आकडा वाढतच राहिला़३९ दिवसांआधी आढळला होता पहिला रुग्णजिल्ह्यातील सर्वात पहिला रुग्ण जळगाव शहरातील मेहरूण परिसरात २८ मार्च रोजी आढळून आला होता़ संबंधित रुग्णाने मुंबईहून रेल्वेने प्रवास केला होता़ चौदा दिवसांच्या कालावधीनंतर हा रुग्ण बरा होऊन घरीही परतला़ यानंतर जळगावातील जोशीपेठेत २६ दिवसांनी नवा रुग्ण आढळला व त्याच्या संपर्कातील पाच जण आढळले़ त्यानंतर जळगावातील चार नवीन वस्त्यांमध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने संसर्ग वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़प्रतिबंधित क्षेत्रातील अधिक रुग्णजे रुग्ण आढळून येत आहेत ते अधिकांश प्रतिबंधित क्षेत्रातील आहे़ त्या भागात आवश्यक त्या बाबी पुरविण्यावर भर आहे़ त्या भागातील कुणीही व्यक्ति बाहेर जाणार नाही व आत कुणीही व्यक्ती आत येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे़ आपण कालच बºयाच ठिकाणांवर जाऊन माहिती घेतली़ अत्यावश्यक बाबी कंटेमेंट झोनमध्ये पोहचविण्याच्या सूचना दिल्या आहेत़ नवीन एरियातील रुग्ण नसल्याने सध्या कम्युनिटी स्प्रेड नाही़ परिस्थिती नियंत्रणात येईल़- डॉ़ बी़ एऩ पाटील,सीईओ जि़ प़ जळगावआता तीन ते चार संपर्कांतील २२६ रुग्णांचे एकाच वेळी नमुने गोळा केले़ तीनही बाधित परिवारातील संपर्क एकदाच सापडल्याने त्यांना आयसोलेट केल्याने कम्युनिटीमध्ये होणार मोठा संसर्गागाच धोका टाळला आहे़ नियंत्रण मिळविणे हे केवळ आरोग्य यंत्रणेच्या हातात नाही, यात नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे़ नियम पाळले गेले पाहिजे़ लोकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे़- डॉ़ एऩ एस़ चव्हाण,जिल्हा शल्यचिकित्सक.आता तीन ते चार संपर्कांतील २२६ रुग्णांचे एकाच वेळी नमुने गोळा केले़ तीनही बाधित परिवारातील संपर्क एकदाच सापडल्याने त्यांना आयसोलेट केल्याने कम्युनिटीमध्ये होणार मोठा संसर्गागाच धोका टाळला आहे़ नियंत्रण मिळविणे हे केवळ आरोग्य यंत्रणेच्या हातात नाही, यात नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे़ नियम पाळले गेले पाहिजे़ लोकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे़- डॉ़ एऩ एस़ चव्हाण,जिल्हा शल्यचिकित्सक.
रुग्णांसोबत वाढवतेय प्रशासनाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 12:46 PM